भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलैपासून सुरू होत आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा याला दौऱ्यावरील वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी अनुभवी सलामीवीर शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. रोहित अनुपस्थितीत असल्याने दुसरा सलामीवीर म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी भारताच्या एका माजी खेळाडूने ऋतुराज गायकवाड याचे नाव पुढे केले.
वेस्ट इंडीजविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली गेली आहे. सलामीवीर म्हणून स्वतः कर्णधार शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन व शुबमन गिल असे पर्याय संघ व्यवस्थापनाकडे आहेत. आता यापैकी कोणाला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय संघ व्यवस्थापनाने पहिल्या वनडेत ऋतुराज गायकवाड याला पदार्पणाची संधी द्यावी, अशी अपेक्षा भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने व्यक्त केली. त्याने ट्विट करत म्हटले,
“मला वाटते वेस्ट इंडीजविरुद्ध शिखर धवनसोबत ऋतुराज गायकवाड याला वनडे पदार्पणाची संधी देण्यात यावी. ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ५ सामन्यात चार शतके ठोकली होती. त्यामुळे तो ती जागा मिळवू शकतो. तसेच त्यामुळे डावे-उजवे सलामीवीर ही रणनीती फायदेशीर ठरू शकते”
I think Ruturaj should make his ODI debut and open with Shikhar in the WI series. Ruturaj scored 4 tons in 5 inns in the Vijay Hazare Trophy, deserves a look in. Also left-right combo stays. #WIvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 21, 2022
घरगुती क्रिकेटच्या मागील हंगामात खेळल्या गेलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने जबरदस्त फलंदाजी केलेली. तसेच तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने पाच डावात १५०.७५ च्या विलक्षण सरासरीने आणि ११२.९२ च्या स्ट्राइक रेटने ६०३ धावा केल्या होत्या. यात चार शतकांचा समावेश होता.
गायकवाडला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे भारतासाठी नऊ टी२० सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे. परंतु त्याची आतापर्यंतची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. असे असले तरी त्याला अद्याप भारतीय संघाकडून वनडे सामन्यात पदार्पणाची प्रतीक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘वनडे क्रिकेट बंद करून टाका…’, माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या सल्ल्याने उडाली खळबळ
‘तो सर्वोत्कृष्ट कर्णधार’, नुकत्याच निवृत्त झालेल्या इंग्लंडच्या दिग्गजाचे मोठे विधान
‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!’ राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होण्यामागे आयसीसीची मोठी रणनिती