श्रीलंकेतील सर्वात मोठी टी२० लीग स्पर्धा ‘ लंका प्रीमियर लीग २०२१’ स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (२३ डिसेंबर) पार पडला. या सामन्यात गॅले ग्लॅडिएटर्स आणि जाफना किंग्स हे स्पर्धेतील दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने होते. या सामन्यातही जाफना किंग्स संघाने अप्रतिम कामगिरी करत २३ धावांनी विजय मिळवला. यासह सलग दुसऱ्यांदा त्यांनी लंका प्रीमियर लीग स्पर्धेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले.(lanka premier league final)
जाफना किंग्स संघाने उभारला २०१ धावांचा डोंगर
या सामन्यात जाफना किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरताना दिसून येत होता. कारण जाफना किंग्ज संघातील सलामीवीर फलंदाजांना चांगली सुरुवात करून देण्यात यश आले होते. या सामन्यात देखील अविष्का फर्नांडोची बॅट तळपली. त्याने ४१ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ६३ धावांची खेळी केली. तर टॉम कोहलर-कॅडमोरने देखील ४१ चेंडुंमध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ५७ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर जाफना किंग्स संघाला २० षटकाअखेर ३ बाद २०१ धावा करण्यात यश आले होते. (Jaffna kings vs galle gladiators)
जाफना किंग्स संघाचा जोरदार विजय
तर गॅले ग्लॅडिएटर्स संघाकडून धावांचा पाठलाग करताना, धनुष्का गुणतिलकाने सर्वाधिक ५४ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. कुसल मेंडिसने ३ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३९ धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ज्यामुळे गॅले ग्लॅडिएटर्स संघाला २० षटक अखेर अवघ्या ९ बाद १७८ धावा करण्यात यश आले. हा सामना २३ धावांनी जाफना किंग्ज संघाने आपल्या नावावर केला.
अंतिम सामन्यात ६३ धावांची खेळी करणाऱ्या अविष्का फर्नांडोची (Avishka Fernando) सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. तसेच या संपूर्ण स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला. ज्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द सिजनचा पुरस्कार देखील देण्यात आला. उपांत्य फेरीच्या सामन्यात देखील अविष्का फर्नांडोने तुफानी शतक झळकावत,आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहचवले होते.
महत्वाच्या बातम्या :
‘या’ भारतीय क्रिकेटपटूला यावर्षी सर्वाधिक वेळा केले सर्च, रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर
“गांगुलीला कर्णधारपदावर बोलण्याचा अधिकार नाही”, दिग्गज भारतीय क्रिकेटर कडाडला
हे नक्की पाहा :