भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफी या स्पर्धेचा नवा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. रणजी ट्रॉफी 2022-2023 या स्पर्धेचे पहिल्या फेरीचे सामने विविध शहरांमध्ये सुरू आहेत. या सर्वात मानाच्या स्पर्धेतून दरवर्षी नवनवीन खेळाडू समोर येत असतात. स्पर्धेच्या या नव्या हंगामात 2019-2022 मध्ये रणजी विजेतेपद पटकावणाऱ्या सौराष्ट्र संघाकडून युवा जय गोहिल याने पदार्पण केले. त्याने या पदार्पणात थेट द्विशतक झळकावून अनेक दिग्गजांच्या यादीत आपले नाव केले.
रणजी ट्रॉफीचा हा नवा हंगाम सुरू झाल्यापासून भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचे नाव चर्चेत आहे. अर्जुननेही याचवेळी गोवा संघाकडून खेळताना आपले रणजी पदार्पण केले. त्याने आपल्या पदार्पणात शानदार शतकी खेळी करत आपल्या वडिलांसारखी सुरुवात केली. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवशी त्याचेच नाव सगळीकडे घेतले जात होते. मात्र, तिसऱ्या दिवशी सौराष्ट्राचा जय गोहिल हा चर्चेत आला.
नुकतीच आपल्या वयाची 22 वर्ष पूर्ण केलेल्या जयने आसामविरुद्ध पदार्पण केले. त्याने आपल्या या पहिल्या सामन्यात आसामच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत वादळी द्विशतक झळकावले. त्याने केवळ 246 चेंडूंवर 227 धावांची खेळी केली. त्याने द्विशतक पूर्ण करण्यासाठी फक्त 216 चेंडूंचा सामना केला होता. जय शिवाय हार्दिव देसाई याने देखील शतक साजरे केले. या दोघांच्या खेळामुळे सौराष्ट्राने आपला पहिला डाव 487 धावांवर घोषित केला.
रणजी पदार्पणात द्विशतक झळकावणारा तो 12 वा फलंदाज ठरला. तसेच सौराष्ट्रासाठी अशी कामगिरी करणार होतो पहिलाच फलंदाज आहे. अमोल मुजुमदार व गुंडाप्पा विश्वनाथ यांसारखे दिग्गज या यादीत समाविष्ट आहेत. सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकत हा जय भारताचे भविष्य असल्याचे देखील म्हटला होता.
(Jai Gohil Hits Double Century On Ranji Trophy Debute)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
उमेश यादवने उडवला बांगलादेशी फलंदाजाचा त्रिफळा, व्हिडिओ होतोय व्हायरल
विराट कोहलीच्या विकेटबाबत तैजुल इस्लामचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याची विकेट घेणे माझ्या कारकिर्दीत…’