प्रो कबड्डी लीग सिझन 9 स्पर्धेतून मोठी बातमी समोर येत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. 17 डिसेंबर) सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडिअम, मुंबई येथे जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटण संघात पार पडला. या रोमहर्षक सामन्यात जयपूर पिंक पँथर्स संघाने 4 गुणांनी पुणेरी पलटण संघावर मात करत विजय मिळवला. प्रो कबड्डी लीगचा किताब जिंकण्याची ही जयपूर संघाची दुसरी वेळ होती. (Jaipur Pink Panthers beat puneri paltan and becomes Pro Kabaddi League Season 9 Champions)
प्रो कबड्डी लीग 2022 (Pro Kabaddi League 2022) या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच पोहोचणाऱ्या पुणेरी पलटण (Puneri Paltan) संघाचा सामना जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) संघाशी झाला. पहिल्या मिनिटापासूनच दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. पलटणचा मुख्य रेडर अस्लम ईनामदार बाकावर असल्याचा तोटा संघाला चांगलाच बसला.
🏆 🏆 🏆 🏆 🏆
🏆 Jaipur 🏆
🏆 Pink 🏆
🏆 Panthers 🏆
🏆 🏆 🏆 🏆 🏆JAIPUR PINK PANTHERS ARE CROWNED CHAMPIONS OF SEASON 9 🙌#JPPvPUN #vivoProKabaddi #FantasticPanga #vivoPKL2022Final #JaipurPinkPanthers #vivoProKabaddi2022Final #Champions pic.twitter.com/h2Fa7VeI24
— ProKabaddi (@ProKabaddi) December 17, 2022
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ बचावात्मक रणनीतीने खेळत होते. दोन्ही संघांनी आक्रमक भूमिका स्वीकारली नाही. मात्र, पहिल्या हाफमध्ये जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटणला सर्वबाद करत अधिकचे दोन गुण खिशात घातले. पहिला हाफ संपला तेव्हा जयपूर 14, तर पलटणचे 12 गुण होते. यावेळी जयपूर संघ 2 गुणांनी आघाडीवर होता.
History Made! 🤩
The Panthers have risen to the challenge and are now crowned champions of Season 9️⃣! 🏆
The roar of the crowd says it all — congratulations to the amazing #PantherSquad!🤩 #RiseOfPanthers #FinalPanga #JPPvPUN #JaiHanuman #TopCats #JPP #Jaipur #vivoProKabaddi pic.twitter.com/KdRMGCitDH
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) December 17, 2022
जयपूरच्या डिफेन्सने पलटणच्या रेडर्सवर चांगलाच लगाम कसला होता. त्यामुळे त्यांना अधिक गुण मिळवणारी रेड मारता आली नाही. स्टार रेडर आकाश शिंदे (Akash Shinde) याला 4 रेडमध्ये फक्त 4 गुण मिळवता आले. दुसरीकडे, जयपूर संघाचे रेडर्स चांगले प्रदर्शन करत होते. अर्जुन देशवाल आणि व्ही. अजित कुमार यांनी प्रत्येकी 6 गुण मिळवले. तसेच, जयपूरचा कर्णधार सुनील कुमार याने हाय फाईव्ह करत डिफेन्समध्ये 5 गुण मिळवले. सामना संपला तेव्हा पुणे 4 गुणांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या हाफच्या शेवटी जयपूर 33, तर पलटणचे 29 गुण होते. अशाप्रकारे जयपूरने हा सामना 4 गुणांनी आपल्या नावावर केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
प्रो कबड्डी: पुणेरी पलटण पहिल्यांदाच अंतिम फेरीत! जयपुरसोबत खेळणार किताबी लढत
प्रो कबड्डी: टायब्रेकरमध्ये विजय मिळवत थलायवाज उपांत्य फेरीत; बेंगलोरनेही मारली बाजी