ऑस्ट्रेलियामध्ये सध्या क्रिकेटचे वारे वाहत असून प्रचंड लोकप्रिय अशी बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. या टी२० स्पर्धेत दर्जेदार क्षेत्ररक्षण ते श्वास रोखून धरायला लावणारी फलंदाजी, असे सगळे क्षण अनुभवायला मिळतात. असाच एक अप्रतिम झेल पकडतानाचा व्हि़डिओ पुढे आला आहे. रविवारी (२४ जानेवारी) ऍडलेड स्टाइकर्स विरुद्ध सिडनी थंडर संघात झालेल्या हंगामातील ५१व्या सामन्यातील हा व्हिडिओ आहे.
झाले असे की, ऍडलेड स्टाइकर्सच्या १६० धावांचे आव्हान डोळ्यांपुढे घेऊन सिडनी थंडर संघ फलंदाजीसाठी मैदानावर उटरला होता. परंतु १०व्या षटकापर्यंत ८४ धावांवर कर्णधार कॅलम फर्ग्युसनसह ४ फलंदाज बाद झाले. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज ऍलेक्स रॉस डावास चालना देत होता. अशात डावातील १२ वे षटक टाकण्यासाठी ऍडलेड स्टाइकर्सचा गोलंदाज पिटर सिड्ले आला.
सिड्लेच्या षटकातील चौथ्या चेंडूवर ऍलेक्सने खणखणीत चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षण करत असलेल्या जॅक वेदरल्ड याने हवेत उंच उडी घेत चक्क एका हाताने त्याचा भन्नाट झेल पकडला. त्यानंतर पंचांप्रमाणे आपण विकेट घेतल्याचा इशारा करत वेदरल्डने आपल्या अप्रतिम झेलचा आनंद साजरा केला.
वेदरल्डच्या या जबरदस्त झेलचा व्हिडिओ बिग बॅश लीगने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दर्शवली असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
JAKE WEATHERALD YEW BEAUTY! #BBL10 pic.twitter.com/fk2kN6bD0S
— KFC Big Bash League (@BBL) January 24, 2021
ऍडलेड स्ट्राइकर्सचा थरारक विजय
सिडनी थंडर विरुद्ध झालेल्या या सामन्यात ऍडलेड स्ट्राइकर्सने ६ धावांनी विजयी पताका झळकावली. प्रथम फलंदाजी करताना ऍडलेड स्ट्राइकर्सच्या आघाडीच्या पाच फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. यामुळे निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर ऍडलेड स्ट्राइकर्सने १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात सिडनी थंडरचे फलंदाज विशेष कामगिरी करू शकले नाहीत आणि २० षटकात ७ विकेट्स गमावत १५३ धावाच करू शकले. सिडनी थंडरकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक ३६ धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
अविश्वसनीय! मार्टिन गप्टिलने घेतलेला हा भन्नाट झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ
कोहली का रहाणे, कोण आहे टीम इंडियाचा उत्कृष्ट कर्णधार?, टी नटराजनने सांगितलं नाव
“जर वॉशिंग्टन सुंदरने हट्ट केला नसता, तर…”, रिषभ पंतने व्यक्त केली खंत