संपूर्ण जगाच्या दृष्टीने निराशजनक ठरलेल्या २०२० या वर्षाची सांगता होण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे, अनेक क्रीडा वृत्तवाहिन्या तसेच क्रीडा संकेतस्थळे या वर्षाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अव्वल क्रीडा संकेतस्थळ असलेल्या ‘ईसपीएन क्रिकइन्फो’ने मागील दशकातील सर्वात व्यस्त खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा २०१० पासूनचा सर्वात व्यस्त गोलंदाज ठरला.
अँडरसन ठरला दशकातील सर्वात व्यस्त गोलंदाज
क्रिकेट जगतातील अव्वल संकेतस्थळांपकी एक असलेल्या ‘ईसपीएन क्रिकइन्फो’ने सन २०१० ते २०२० या कालावधीतील सर्वात व्यस्त फलंदाज व गोलंदाजांची यादी जाहीर केली आहे. गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हा सर्वात व्यस्त गोलंदाज ठरला. या दहा वर्षांच्या काळात अँडरसनने सर्वाधिक चेंडू टाकण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे, मागील दशकात सर्वाधिक वेळा ठरलेल्या अव्वल पाच गोलंदाजांमध्ये पहिल्या दोन्ही स्थानी इंग्लंडचेच गोलंदाज आहेत, तर इतर तीन स्थाने अनुक्रमे भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेच्या खेळाडूंचा क्रमांक लागतो.
जेम्स अँडरसनने २०१० ते २०२० या काळात आंतरराष्ट्रीय कसोटी, वनडे ए व टी२० सामन्यात मिळून तब्बल २७,३०८ चेंडू टाकले आहेत.
अँडरसननंतर लागतो या खेळाडूंचा क्रमांक
जेम्स अँडरसन पाठोपाठ मागील दशकात सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये इंग्लंडच्याच स्टुअर्ट ब्रॉडचा क्रमांक लागतो. ब्रॉडने मागील दशकात इंग्लंडसाठी खेळताना २६, ८९० चेंडू टाकले आहेत. अँडरसन- ब्रॉड या इंग्लिश दुकलीनंतर भारताचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६,४५९ चेंडू फलंदाजांना टाकले. अश्विननंतर चौथा क्रमांक ही एका फिरकी गोलंदाजाचाच आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायन याने २०१० ते २०२० या काळात २५,९३९ चेंडू फेकले आहेत. मागील दशकात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा निवृत्त फिरकीपटू रंगना हेराथ याने पाचवे स्थान मिळवले. हेराथने या कालावधीत २४,२५३ चेंडू टाकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! पुढील ६ महिन्यांसाठी टीम इंडियाचा धडाकेबाज गोलंदाज संघातून बाहेर
‘कृपा कर आणि आता पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचाही राजीनामा दे’, चाहत्यांची जोरदार मागणी
मोठी बातमी! विश्वचषकात पहिली हॅट्रिक घेणारा क्रिकेटपटू बनला भारतीय निवड समीतीचा प्रमुख
ट्रेंडिंग लेख-
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
‘बॉक्सिंग डे कसोटी’ म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर