---Advertisement---

दात तुटून रक्तबंबाळ झालेलं फलंदाजाचं तोंड, पाहा एँडरसनने फेकलेल्या घातक चेंडूचा व्हिडिओ

On: गुरूवार, जून 9, 2022 8:52 PM
Daniel-Flynn
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा काही खतरनाक घटना घडल्याचे पाहायला मिळत असते. अनेकदा गोलंदाजाच्या घातक चेंडूपासून फलंदाज आपले रक्षम करण्यस असमर्थ असल्याचे आढळते. त्यानंतर फलंदाजाला दुखापत झाल्याचेही आपण अनेकदा पाहतो. मात्र, एखाद्या गोलंदाजाने फलंदाजाच्या तोंडातील दात तोडण्याचा कारनामा तुम्ही कदाचितच ऐकला असेल. हे दृश्य पाहायला मिळाले होते इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यांत

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंडचा (New Zeland) संघ २००८ साली लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी सामना खेळत होता. त्यावेळी इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) गोलंदाजी करत होता. अँडरसन त्यावेळी युवा असल्याने धारदार गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध होता. त्याच्या वेगापुढे अनेक फलंदाजांनी शस्त्रे टाकली होती. त्यावेळी न्यूझीलंडचा फलंदाज डॅनियल फ्लिन (Daniel Flynn) फलंदाजी करत होता.

न्यूझीलंड संघाची धावसंख्या त्यावेळी १३० धावांवर ४ बाद अशी होती. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या फ्लिनला अँडरसनने एक खतरनाक बाऊंसर फेकला. त्या बाऊंसरचे उत्तर फ्लिनकडे नव्हते. त्यावेळी चेंडू मारण्यात फ्लिनला अपयश आले. चेंडू थेट फ्लिनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. चेंडूचा फटका इतका जोरदार होता की हेल्मेट थेट फ्लिनच्या तोंडावर आदळले आणि तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला.

तोंडातून रक्त ओघळताना बघून न्यूझीलंड संघाचे चिकित्सक मैदानावर हजर झाले. त्यावेळी सर्वांना कळाले की, अँडरसनच्या चेंडूने फ्लिनच्या दातांचा बळी घेतला होता. दात पडल्याने तोंडातून रक्त येत असल्याने फ्लिनला आरोग्याच्या कारणास्तव मैदानाबाहेर नेण्यात येते. त्यामुळे पुढील सामन्यांत फ्लिनला फलंदाजी करता येत नाही.

दरम्यान, पुढील कसोटी सामन्यांत फ्लिनने जोरदार पुनरागमन केले. व इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्यांत ४९ धावांची खेळी केली. शिवाय अँडरसनच्या गोलंदाजीचा बिनधोक प्रतिकार केला.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

दीडशेहून अधिक वेगाने बॉलिंग करणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजावरील बॅन हटला, ‘या’ कारणामुळे आणली होती बंदी

‘मी ही जागा कुठेतरी पाहिलीये’, दिनेश कार्तिकच्या पुनरागमनावर माजी दिग्गजाची प्रतिक्रिया व्हायरल

आरसीबीच्या वेगवान गोलंदाजाचे रणजी ट्रॉफीत विक्रमी अर्धशतक, ‘एवढ्या’ चेंडूत ठोकली फिफ्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---