लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात केनिंग्टन ओव्हल मैदानावर पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने पंचाशी केलेल्या गैरवर्तवणुकीमुळे आयसीसीने त्याला शिक्षा ठोठावली आहे.
त्याला आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 नुसार 15% मॅच फीचा दंड करण्यात आला आहे. अँडरसन हा खेळाडू आणि खेळा़डूंच्या पाठिंबा देणारे कर्मचारी यांच्यासाठी असलेल्या आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.1.5 चे उल्लंघन केल्यामुळे दोषी ठरला आहे.
त्याच्यावर आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या निर्णयावर राग व्यक्त केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच याबरोबरच त्याला 1 डिमिरीट पॉइंटही देण्यात आला आहे.
सप्टेंबर 2016 मध्ये सुधारित आचार संहिता लागू झाल्यापासून पहिल्यांदाच अँडरसन दोषी ठरला आहे.
BREAKING: James Anderson has been fined 15 per cent of his match fee for breaching Level 1 of the ICC Code of Conduct.
Details ⬇️https://t.co/IVAFtZk03H pic.twitter.com/VMe7UCq4dy
— ICC (@ICC) September 9, 2018
ही घटना भारताचा पहिल्या डावातील 29 व्या षटकात घडली. त्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचीत बादचा निर्णय फेटाळल्याने अँडरसनने मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांच्याकडून त्याची कॅप हिसकावली आणि त्यांच्या विरुद्ध राग व्यक्त केला.
अँडरसनने आपली चूक मान्य केली असुन आयसीसीचे मॅच रेफ्री एलिट पॅनलचे सदस्य असलेले अॅन्डी पायक्रॉफ्ट यांनी केलेली कारवाईही मान्य केली आहे. त्यामुळे यावर अधिकृत सुनावणीची गरज नाही.
अँडरसनवर हे आरोप मैदानावरील पंच कुमार धर्मसेना आणि जोएल विल्सन, थर्ड अंपायर ब्रुस आॅक्सनफोर्ड, आयसीसीचे एलिट पॅनलचे सर्व पंच आणि फोर्थ अंपायर टिम रॉबिनसन यांनी लावले.
या सामन्यात भारताने दुसऱ्या दिवसाखेर 6 बाद 174 धावा केल्या आहेत.
तसेच या सामन्यात अँडरसनने दुसऱ्या दिवशी (8 सप्टेंबर) 2 विकेट्स घेऊन भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट घेण्याचाही विक्रम केला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–जेव्हा मी कोर्टवर प्रवेश केला तेव्हा मी सेरेनाची चाहती नव्हते- नाओमी ओसाका
–युएस ओपन: सेरेना विल्यम्सला पराभूत करत नाओमी ओसाकाने रचला इतिहास
–जेम्स अँडरसन ठरला टीम इंडियाच्या फलंदाजांसाठी सर्वात धोकादायक गोलंदाज