दक्षिण आफ्रिका संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने स्वतःच्या नावावर कारकिर्दीतील सर्वात मोठा विक्रम नोंदवला. मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्ड मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अँडरसनने दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार डीन एल्गर याला क्लीन बोल्ड केले आणि ही मोठी कामगिरी नावावर केली.
जेम्स अँडरसन (James Anderson) याने मागच्याच महिन्यात वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण केले. 40 वर्ष वय असलेला इंग्लंडचा हा दिग्गज वेगवान गोलंदाज आजही एखाद्या युवा गोलंदाजाला लाजवेल, असे त्याचे प्रदर्शन आहे. आफ्रिकी संघाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना अँडरसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला. त्याच्या नावावार आता एकूण 949 विकेट्सची नोंद झाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 949 विकेट्स घेणारा एकमेव गोलंदाज होता. शनिवारी (27 ऑगस्ट) डीन एल्गर (Dean Elgar) याला क्लीन बोल्ड केल्यानंतर अँडरसन या यादीत त्याच्या बरोबरीला पोहोचला आहे. सध्या हे दोघेही संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी सामन्यात जर त्याने अजून एक विकेट घेतली, तर तो मॅकग्रा यांनाही मागे टाकेल.
What a bowler, one of the greatest – James Anderson. pic.twitter.com/3MEvoEcJm2
— Johns. (@CricCrazyJohns) August 27, 2022
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिटेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये गॅकग्रा आणि अँडरसननंतर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम यांचे नाव आहे. अक्रम यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत 916 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज शॉन पोलॅक आहे, ज्याने 829 विकेट्स घेतल्या आहेत.
तत्पूर्वी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंडने एक डाव आणि 12 धावांच्या मोठ्या अंतराने पराभव स्वीकारला होता. मालिकेत आफ्रिकी संघ 0-1 असा आघाडीवर आहे. असे असले तरी, दुसऱ्या कसोटी सामन्यात मात्र आफ्रिकी संघ अडचणी आहे. इंग्लंडने पहिल्या डाव 9 विकेट्सच्या नुकसानावर 415 धावा करून घोषित केला. त्याआधी आफ्रिकी संघ अवघ्या 151 धावांवर गुंडाळला गेला होता. दुसऱ्या डावातही आफ्रिकन संघाने अवघ्या 54 धावांवर पहिल्या तीन विकेट्स गमावल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘सुरुवात अशी पाहिजे!’ आशिया चशकाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये गोलंदाजाने गाजवलं मैदान
आशिया चषक जिंकल्यावर रोहित होणार ‘शर्टलेस’, पाहा चाहत्याला काय दिलंय वचन
‘हिटमॅनचा सिक्स का बाबरचा क्लास?’ दुबईतील खेळपट्टी कोणाला करणार मदत, वाचा सविस्तर