वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यानं निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतरही तो या कसोटी मालिकेत इंग्लंड संघासोबतच राहणार असला तरी त्याला वेगळी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. हा वेगवान गोलंदाज कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी गोलंदाजी मार्गदर्शक म्हणून इंग्लंड संघात सामील झाला आहे. मालिकेतील दुसरा सामना गुरुवार 17 जुलैपासून ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम येथे खेळला जाईल.
मालिकेतील दुसऱ्या सामन्यापासून अँडरसन नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो इंग्लंडच्या गोलंदाजी लाइनअपचा मार्गदर्शक असेल आणि मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो या भूमिकेत राहील. मात्र मालिका संपल्यानंतर तो संघासोबत आपली भूमिका कायम ठेवणार की नाही, हे बोर्ड ठरवणार आहे. इंग्लंडनं कसोटी आणि मर्यादित षटकांच्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे प्रशिक्षक आणि कर्णधार नियुक्त केले असल्यामुळे अँडरसनला कसोटी संघात गोलंदाजी प्रशिक्षक किंवा मार्गदर्शकाची पूर्णवेळ जबाबदारी मिळू शकते.
जेम्स अँडरसन हा कसोटी क्रिकेटमध्ये 700 हून अधिक बळी घेणारा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. 41 वर्षीय अँडरसननं शेवटच्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेतल्या होत्या. अशाप्रकारे त्यानं एकूण 704 विकेट्स घेत आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट केला.
यजमान इंग्लंडनं मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. हा सामना तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच संपला. सामन्याच्या पहिल्या डावात अँडरसनला एकच विकेट मिळाली होती. मात्र दुसऱ्या डावात तो 3 विकेट घेण्यात यशस्वी ठरला. नवोदित गस ऍटकिन्सननं तुफानी गोलंदाजी करत सामन्यात एकूण 10 बळी घेतले. पहिल्या डावात त्यानं 7 विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अमित मिश्राच नाही तर या क्रिकेटपटूंनीही केली आहे वयात गडबड, एकानं यावर्षीच जिंकला आयपीएल खिताब
यशस्वी जयस्वालला बंपर फायदा, गिलची 36 स्थानांची झेप! ताजी टी20 क्रमवारी जाहीर
10 षटकात 250 धावा… दोघांनी ठोकली शतकं..!! अशी फलंदाजी स्वप्नातही पाहिली नसेल