इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तिसरा ऍशेस सामना गुरुवारी (6 जुलै) लीड्सच्या हेडिंग्ले स्टेडियमवर सुरू होणार आहे. इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन या सामन्यात खेळताना दिसणार नाही. मागच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अँडरसन आपली कमला दाखवू. हेडिंग्ले कसोटीच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी (5 जुलै) इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन घोषित करण्यात आली.
हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्क वुड (Mark Wood) आणि ख्रिस वोक्स (Chris Woakes) यांना सामील केले गेले आहे. या दोघांसाठी ऍशेस 2023चा हा पहिलाच सामना असेल. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) एजबस्टनवर मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला. पण दुखापतीमुळे लॉर्ड्स कसोटीतून त्याला माघार घ्यावी लागली होती. हेडिंग्ले कसोटीपूर्वी मोईनने आपली फिटनेस पुन्हा मिळवली असून प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला सामील करण्यात आले आहे.
लॉर्ड्स कसोटी खेळलेल्या जेम्स अँडरसन (James Anderson) आणि जोश टंग (Josh Tongue ) यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती दिली जाणार, अशा चर्चा आधीच सुरू होत्या. बुधवारी संघ घोषित झाल्यानंतर या चर्चा खऱ्या ठरल्या. इंग्लंडसाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळमारा ओली पोप (Ollie Pope) दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाहीये. पोपच्या अनुपस्थितीत हॅरी ब्रुक संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल.
दरम्यान, ऍशेस 2023 हंगाम इंग्लंडसाठी आतापर्यंत खूपच निराशाजनक राहिला आहे. मायदेशात सुरू असलेल्या या मालिकेत इंग्लंडने अद्याप एकही विजय मिळवला नाहीये. दुसरीकडे पाहुण्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिलवला आहे. अशात मालिकेतील तिसरा सामना निर्णायक ठरू शकतो. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अँडरसन फक्त तीन विकेट्स घेऊ शकला होता. असात संघ व्यवस्थापनाने तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती दिल्याचे दिसते. अँडरसनच्या आणि टंग यांच्या जागी मार्क वुड आणि ख्रिस वोक्स काय कमाल करणार, याकडे सर्वांचे लक्ष्य लागे आहे. (James Anderson to miss the third Ashes Test against Australia.)
हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइगं इलेव्हन –
झॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, जो रूट, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), मोईन अली, ख्रिस वोक्स, मार्क वुड, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब्रॉड.
महत्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटी गाजवणारा स्मिथ कसोटी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी विराजमान, पण अव्वलस्थान ‘या’ दिग्गजाकडे
कसोटी रँकिंगमध्ये अश्विन-जडेजाची बादशाहत कायम! जगाला दिले दाखवून ‘आम्हीच सगळ्यात भारी’