ऍशेस 2023 हंगाम 16 जून रोजी इंग्लंडमध्ये सुरू होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांचे लाखो चाहते या मालिकेसाठी वाट पाहत आहेत. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आपल्या संघातील खेळाडूंच्या फिटनेसची काळजी घेत आहेत. जेणेकरून ऍशेसमध्ये पूर्ण ताकदीसह मैदानात उतरता येईल. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आपल्या फिटनेसविषयी एक चांगली बातमी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच इंग्लड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खुलासा केला होता की, त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याला दुखापत झाली आहे. माहितीनुसार अँडरसनला ग्रोइनची दुखापत झाली होती. असे असले तरी, अँडरनने नुकतीच माहिती दिली आहे की, तो या दुखापतीतून सावरत आहे. ऍशेस 2023 पूर्ण दुखापतीतून पूर्णपणे सावरण्याची अपेक्षा त्याला आहे. एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अँडरसन म्हणाला, “मी या धुकापीतीमुळे जराही चिंतेत नाहीये. खेळाडूंना दुखापती होत राहतात. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की, येत्या दोन आठवड्यांमध्ये मी आपली फिटनेस पूर्णपणे मिळवेल. ऍशेस मालिकेसाठी मी पूर्णपणे तयार असेल.”
“याकडे (दुखापत) पाहून मला खूपच राग येतो. कारण आपण नेहमी चांगले वाटावे, अशी आपली इच्छा असते. कोणत्याही मालिकेत किंवा त्याच्या आधी चांगली गोलंदाजी करावी. माजी अजिबात इच्छा नव्हती की उन्हाळा अशा पद्धतीने सुरू व्हावा. पण काहीच अडचण नाही, मी याविषयी जास्त चिंता करत नाही,” असे अँडरसन पुढे म्हणाला.
दरम्यान ऍशेस मालिका सुरू होण्याआधी इंग्लंडला आयर्लंडविरुद्ध एक कसोटी सामना खेळायच आहे. 1 जून रोजी हा सामना सुरू होईल. अँडरसन या सामन्याला मुकण्याची पूर्ण शक्यता आहे. अँडरसन इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील एक महान वेगवान गोलंदाज राहिला आहे. त्याने कारकिर्दीत 179 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 685 विकेट्स घेतल्या आहेत. (James Anderson will be fully fit ahead of the Ashes 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गनर्स एफसी, इंद्रायणी संघांची सनसनाटी सुरुवात; थंडरकॅटस, सांगवी एफसी ब संघांची आगेकूच
अखेरच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली करणार राडा, संघाकडून आली ‘ही’ सर्वात मोठी प्रतिक्रिया