सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यामालिकेतील दुसरा कसोटी सामना सध्या सुरू आहे. या कसोटी सामन्यांत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमला बाद करत नवा विक्रम रचण्याकडे पाऊल टाकले आहे. टॉम लेथमला बाद करत अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ६४७वा बळी आपल्या नावे केला आहे.
इंग्लंड (England) संघाचा जलद गतीचा गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. जेम्सने त्याच्या कसोटी कारकिर्दीत जोरदार पुनरागमन करत न्यूझीलंड (New Zeland) विरुद्ध पहिल्या कसोटीत ४ बळी आपल्या नावे केले. अँडरसनने न्यूझीलंड विरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात यंग, टॉम लॅथम, टीम साऊदी आणि कायले जेमिसन यांना बाद केले. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसीच्या दुसऱ्या सत्राच्या अखेरपर्यंत १ बळी घेतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यांतील दुसऱ्या डावांत अँडरसन मैदानावर उपस्थित नव्हता.
सध्या जेम्स ३९ वर्षांचा असून मुथय्या मुरलीधरनचा (Muttiah Muralitharan) विक्रम मोडण्याच्या यादीत तो सध्या सर्वोच्च स्थानी आहे. जेम्सने आत्तापर्यंत १७१ कसोटी सामन्यांत ६४७ बळी घेतले आहेत. जेम्स त्याच्या कारकीर्दीत आणखी काही काळ असाच चांगल्या फॉर्ममध्ये खेळत राहिल्यास तो मुरलीधरनचा विक्रम मोडू शकतो. शिवाय आणखी ३ बळी घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ६५० बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावे करू शकतो. याआधी केवळ मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांनीच ६५० धावांचा टप्पा पार केला आहे.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तुर्तास दुसऱ्या कसोटी सामन्यांत केन विल्यम्सन खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागेवर न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लेथम संघाचे नेतृत्व करणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यांत नाणेफेक जिंकत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही संघात जालेला पहिला कसोटी सामना इंग्लंंडने ५ गडी राखत खिशात घातला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Ranji Trophy 2022 । खुद्द क्रीडामंत्र्यानेच शतक झळकावत बंगालला सेमीफायनलमध्ये पोहोचवलं
‘हार्दिकवर अजिबात दबाव आणू नका,’ भारताच्या माजी दिग्गजाचे पंड्याला समर्थन
स्ट्राईक देण्याच्या वादावर आशिष नेहराचा कार्तिकला पाठिंबा, पंड्याला झापत म्हणाला, ‘तिथं मी नव्हतो…’