क्रिकेट विश्वातील स्विंग गोलंदाजीचा बादशाह म्हणजे जेम्स अँडरसन. ३८ वर्षीय या गोलंदाजाने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून ६०० विकेट्सपेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा विक्रम नोंदवला आहे. त्याने त्याच्या कसोटी कार्किदीत आता पर्यंत ६१६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने ३ वेळा सामन्यांत १० विकेट्स घेतल्या आहेत. पण, मंगळवारी त्याने त्याच्या कारकिर्दीबद्दल केलेला एक खुलासा ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल .
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाजचे असे मत होते की तो कसोटी क्रिकेटसाठी उत्कृष्ट असा खेळाडू नाही आहे. जेम्स अँडरसने न्यूझीलंड विरुद्ध १० जूनपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्याअगोदर आपल्या कसोटी क्रिकेट प्रवासाचा अनुभव सांगितला आहे. अँडरसनने मंगळवारी सांगितले की काऊंटी क्रिकेट ते आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेट हे खूप मोठे पाऊल आहे.
तो म्हटला “मला अजूनही आठवत की माझ्या पहिल्या कसोटी सामन्यात नासिर हुसेनने माझ्या गोलंदाजीसाठी फाईन लेगला क्षेत्ररक्षण लावले नव्हते आणि माझा पहिला चेंडू हा नो बॉल होता. म्हणून त्यावेळी मी खूप घाबरलेलो होतो. मला वाटले नव्हते की मी आज जिथे आहे या शिखरावर मी पोहोचेल.”
जेम्स अँडरसन जर १० जूनचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना खेळला तर तो त्याच्यासाठी एक मोठा विक्रम होईल व हा त्याचा कारकिर्दीतील १६२ वा कसोटी सामना असेल. त्यामुळे तो इंग्लंडचा दिग्गज फलंदाज ऍलिस्टर कूकचा १६१ कसोटी सामन्यांच्या विक्रम मोडत इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा खेळाडू बनेल.
जेम्स अँडरसनने सांगितले “कसोटी क्रिकेटमध्ये हे १५ वर्ष माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. की ऍलिस्टर कुकने किती कसोटी सामने खेळले आहेत तेवढे कसोटी खेळणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. मला असे वाटते की दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा जगातील सर्वात चांगल्या संघांसोबत खेळणे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही अशा बलाढ्य संघासमोर चांगले प्रदर्शन करता, तेव्हा तुम्हाला विश्वास येतो की हो आपण या स्तरावर चांगले प्रदर्शन करू शकतो. हे मी करू शकतो, हा विचार पूर्णपणे माझ्या डोक्यात बसण्यासाठी मला काही वर्ष व अनेक आंतराष्ट्रीय सामने खेळावे लागले.”
जेम्स अँडरसनने १८ वर्षांपूर्वी २००३ साली झिम्बावे विरुद्ध लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ही कामगिरी उल्लेखनीय आहे. तसेच एक वेगवान गोलंदाज म्हणून एवढे वर्ष कसोटी क्रिकेट खेळणे म्हणजे आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: न्यूझीलंडच्या ‘या’ गोलंदाजापासून पुजाराला आहे धोका; आत्तापर्यंत ४ वेळा केलंय बाद
न्यूझीलंड संघासाठी धोक्याची घंटा!! संघातील ‘हे’ २ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे होऊ शकतात संघाबाहेर
वाढदिवस विशेष: प्रेक्षकांचा आवडता ऑस्ट्रेलियन खेळाडू दारुमुळे संपला, वाचा ‘त्या’ क्रिकेटरची कहाणी