ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉकनरने (James faulkner) पाकिस्तान सुपर लीगमधून (pakistan super league) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या ३१ वर्षीय खेळाडूने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर गंभीर आरोप करत लीगमधून माघार घेतल्याची जाहीर घोषणा केली आहे. त्याने शनिवारी (१९ फेब्रुवारी) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दोन ट्विट करत पीसीबीवर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. पीसीबीने अद्याप त्याला पैसे दिलेले नाहीत आणि ते त्याच्याशी बरेच दिवस खोटे बोलत असल्याचे त्याने म्हटलं आहे.
जेम्स फॉकनरने ट्विट केले की, “मी पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. परंतु पीसीबीकडून मला निश्चित मानधन न मिळाल्यामुळे मला शेवटच्या दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली आणि पीएसएल सोडावी लागली. मी सुरुवातीपासूनच येथे आहे आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड माझ्याशी खोटे बोलत होते.”
https://twitter.com/JamesFaulkner44/status/1494975761144504327?s=20&t=Bl7XHfWuYaR_LkVu2tczNw
https://twitter.com/JamesFaulkner44/status/1494976081581215744?s=20&t=Bl7XHfWuYaR_LkVu2tczNw
फॉकनर आणखीन एक ट्वीट करत म्हणाला, “लीग सोडताना मला दुःख होत आहे. कारण मला पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्यासाठी मदत करायची होती. कारण येथे खूप तरुण आहेत आणि चाहते सुद्धा खूप आहेत. पण माझ्यासोबत ज्या पद्धतीने व्यवहार केला गेला, तो पीसीबी आणि पीएसएलच्या वतीने अपमानास्पद आहे. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांना माझी स्थिती समजत असेल.”
https://twitter.com/TheRealPCB/status/1495026680213168130?s=20&t=HNc3qEz9nd2hKZ2k4zLEBg
ऑस्ट्रेलियाचा हा शानदार अष्टपैलू खेळाडू पीएसएलमधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाचा भाग होता. पीएसएलमध्ये जेम्स फॉकनरने अनेक महत्त्वाच्या खेळी खेळण्याव्यतिरिक्त शानदार गोलंदाजी सुद्धा केली आहे. पीएसएल २०२२ मधील क्वेटा ग्लॅडिएटर्स संघ ९ पैकी ३ सामने जिंकून गुणतालिकेत ५ व्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाकडून ६९ एकदिवसीय आणि २४ टी२० सामने खेळलेला जेम्स फॉकनर दीर्घ काळापासून ऑस्ट्रेलियन संघातून बाहेर आहे. त्याने एकदिवसीय कारकिर्दीत ९६ विकेट घेतल्या आहेत, तर टी२० मध्ये ३६ विकेट घेतल्या आहेत. यावर्षी आयपीएल २०२२ च्या लिलावात त्याला कोणत्याच फ्रँचायझीने खरेदी केलेले नाही. आयपीएलच्या ६० सामन्यांमध्ये त्याच्या नावावर ५२७ धावा आणि ५९ विकेट आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSL: भविष्यासाठी ऍक्शन सुरू; पूर्वसूचना देत रहाणे, पुजारासह ४ सीनियर्सची कसोटी संघातून सुट्टी
नीता अंबांनी यांच्या प्रयत्नांना यश, भारताकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचे यजमानपद
भुवीवर टीका होत असूनही का दिली जात आहे खेळण्याची संधी? कर्णधार रोहित शर्माने केले स्पष्ट






