---Advertisement---

Video: जेम्स निशम नावाच्या वादळाने इंग्लंडचा तोंडचा घास घेतला हिरावून, पाहा सामन्याला कलाटणी देणारा क्षण

On: शुक्रवार, नोव्हेंबर 12, 2021 1:26 AM
---Advertisement---

न्यूझीलंडने रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी धडक मारली. अंतिम फेरीत त्यांचा सामना ११ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्याशी होईल. पहिल्या उपांत्य सामन्यात सोळाव्या षटकापर्यंत इंग्लंडचे पारडे जड दिसत होते, मात्र सतराव्या षटकात जेम्स नीशमने अशी तुफानी फलंदाजी केली की न्यूझीलंड विजयाच्या समीप पोहचला.

सतराव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या इंग्लडच्या ख्रिस जॉर्डनला लक्ष्य करताना नीशमने २ षटकार आणि १ चौकार लगावला. या षटकात एकूण २३ धावा झाल्या. नीशमने स्क्वेअर लेगवर पहिल्या चेंडूवर षटकार आणि लाँग ऑनच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर त्याने चौथा चेंडू लाँग ऑनच्या दिशेने षटकार ठोकला. या व्यतिरिक्त या षटकात २ वाइड आणि २ लेग बायच्या रूपात ४ अतिरिक्त धावा देखील मिळाल्या.

https://www.instagram.com/p/CWGo0LBoFpe/

या षटकानंतर सामन्याचा कल बदलायला सुरुवात झाली. अठराव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नीशमने पुन्हा आदिल रशीदला षटकार ठोकला. यानंतर डॅरिल मिशेलने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. या षटकात १४ धावा झाल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर नीशम बाद झाला. पण डॅरिल मिशेलने सामन्याचा निकाल न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला होता. त्याने ख्रिस वोक्सच्या एकोणिसाव्या षटकात २ षटकार आणि एक चौकार मारत ६ चेंडू बाकी असताना संघाला सहज विजय मिळवून दिला.

https://www.instagram.com/p/CWGp-L9ISQD/

न्यूझीलंडची धावसंख्या एकवेळ दोन बाद १३ अशी झाली होती, पण मिशेलने ४७ चेंडूंत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या. त्याने डेव्हन कॉनवेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावा जोडल्या. डेव्हन कॉनवेने ३८ चेंडूत ४६ धावा केल्या, आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. जेम्स नीशमने ११ चेंडूत ३ षटकारांच्या मदतीने २७ धावांची धडाकेबाज खेळी केल्याने न्यूझीलंडने १९ षटकांत ५ बाद १६७ धावा करून विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात असं काय झालं की, समालोचकाला आठवला एमएस धोनी

जेव्हा जिगरी दोस्त अवेश खानने व्यंंकटेश अय्यरला दिली टीम इंडियात निवड झाल्याची बातमी, वाचा किस्सा

इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल जिंकल्यानंतर जिमी नीशम आपल्या खुर्चीवरून का हलला नाही? स्वत:च केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---