हिरो इंडियन सुपर लीग 2022-23 ( आयएसएल) मध्ये जमशेदपूर एफसीला मागील तीन सामन्यांत हार मानावी लागली आहे. आता रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) घरच्या मैदानावर नशीब बदलण्याच्या त्यांचा प्रयत्न असेल. जमशेदपूर एफसीला येथील जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवर ईस्ट बंगाल एफसीचा सामना करायचा आहे. ईस्ट बंगाललाही मागील सामन्यात हार मानावी लागली आहे आणि त्यामुळे दोन्ही संघ विजयपथावर परतण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
इशान पंडिताने गोल केल्यानंतर जमशेदपूर एफसीला गुण सुरक्षीत केला असा आत्मविश्वास झाला होता, परंतु चेन्नईयन एफसीने दनादन दोन गोल केले आणि ३-१ असा विजय मिळवला. मुख्य प्रशिक्षक एडी बूथरॉइड यांच्या रणनीतीची अंमलबजावणी करण्यास जमशेदपूर एफसीच्या गोलंदाजांना अपयश आले. वेलिंग्टन प्राओरीला दुखापतीमुळे 16व्या मिनिटाला मैदानाबाहेर जावे लागले. जमशेदपूरला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. यापूर्वी जर्मनप्रीत सिंगसह तीन खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहेत. ईस्ट बंगाल विरुद्धच्या लढतीत डॅनिएल चुक्वू मैदानावर उतरणार असल्याने यजमानांचे मनोबल उंचावले आहे.(Club Statistics)
“आमच्या संघात अनेक दुखापती झाल्या आहेत आणि त्यामुळेच मला संघ निवडताना लवचिकता ठेवावी लागते. खेळाडूंचा विचार करून निवडावा लागतो. या खेळात जादुई मार्ग शोधण्याचा आमचा प्रयत्न नाही. सर्व खेळाडूंनी तंदुरुस्त रहावे आणि मजबूतीने प्रतिस्पर्धींचा सामना करण्याची गरज आहे. आम्ही फक्त सुरुवात चांगली करणार नाही आहोत, तर शेवटही गोड करणार आहोत,”असे बूथरॉइड म्हणाले.
ईस्ट बंगाल एफसीला 2-0 अशा आघाडीनंतरही ओडिशा एफसीकडून पराभव पत्करावा लागला. ईस्ट बंगालकडून बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरलेल्या पेड्रो मार्टिनने दोन गोल करून 2-2 अशी बरोबरी मिळवली. त्यानंतर जेरी माविहमिंगथांगा व नंदाकुमार सेकर यांनी गोल करताना ईस्ट बंगालचा 2-4 असा पराभव केला. पण, ईस्ट बंगाल एफसीला मधल्या फळीची चिंता आहे. चॅरिस किरियाकू हा दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. तो जमशेदपूरविरुद्धच्या लढतीत खेळणार की नाही याचा निर्णय रविवारीच होईल.
”जमशेदपूर एफसीने मागील पर्वात लीग शील्ड जिंकली होती, त्यामुळे त्यांच्या प्रती माझ्या मनात आदर आहे. बूथरॉइड हे चांगले प्रशिक्षक त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. आम्ही प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा आदर करतो. आम्ही येथे पराभूत होण्यासाठी आलेलो नाही. आम्ही विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. आशा करतो की कोलकातात आम्ही तीन गुण घेऊनच परतू,”असे मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईन म्हणाले.
उद्याच्या सामन्यातील विजय जमशेदपूरला 9 गुणांसह आठव्या क्रमांकावर पोहचवू शकतो. ईस्ट बंगालच्या तुलनेत जमशेदपूर एक सामना कमीच खेळलेले आहेत आणि ही त्यांच्यासाठी तालिकेत आगेकूच करण्याच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दणदणीत विजयासह मुंबई सिटी एफसी टेबल टॉपर; नॉर्थ ईस्ट युनायटेडचा सलग सातवा पराभव
अर्जेंटिनाला पराभूत केल्याने ‘राजा’ भलताच खूष! सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडूला रोल्स रॉयस ‘गिफ्ट’