जमशेदपूर, ३ डिसेंबर : सलग चार पराभव पत्करणाऱ्या जमशेदपूर एफसीला हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मधील उर्वरित सामन्यात विजय महत्त्वाचा आहे. रविवारी घरच्या मैदानावर त्यांना सलग चार विजयांची नोंद करणाऱ्या केरळा ब्लास्टर्सचा सामना करायचा आहे. जमशेदपूरची आयएसएलमधील सर्वात खराब कामगिरी झालेली आहे आणि मागील चार सामन्यांत त्यांना एक गुणही मिळवता आलेला नाही.
तालिकेत दहाव्या क्रमांकावर असलेल्या जमशेदपूरने सात सामन्यात केवळ एक विजय मिळवला आहे. तोही विजय तालिकेत तळावर असलेल्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी विरुद्ध त्यांना मिळवता आला आहे. मागील चार सामन्यांत जमशेदपूर एफसीविरुद्ध प्रतिस्पर्धींनी १० गोल केले आहेत, तर जमशेदपूरला केवळ दोनच गोल करता आले आहेत.
मागील सामन्यात दुसऱ्या मिनिटाला ईस्ट बंगाल एफसीने त्यांना बॅकफूटवर फेकले होते आणि त्यानंतर ३-१ असा विजय मिळवला होता. दुखापतीन क्लब त्रस्त असला तरी मुख्य प्रशिक्षक एडी बूथ्रोयड यांनी दुखापत किंवा बॅड लक यांना पराभवासाठी दोषी ठरवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी संघाची कामगिरी उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हटले होते.
बूथ्रोयड यांना मागील सामन्यात महत्त्वाचा मध्यरक्षक वेलिंग्टन प्रिओरी व जर्मनप्रीत सिंग यांच्याशिवाय खेळावे लागले होते. डॅनिएल चुक्वू हा उद्याची लढत खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे आणि केरळा ब्लास्टर्स विरुद्ध तो सुरुवातीपासून मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. हिरो आयएसएलमध्ये जमशेदपूर एफसीकडून सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याला खुणावतोय. (Club Statistics)
”सातत्य हे महत्त्वाचे आहे. चुकीचे निर्णय आणि इतरांसाठी संधी निर्माण करण्याचा फटका बसला. आता संघाला आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. आम्हाला पुनरागमनाची गरज आहे. आम्ही गोल करतोय, परंतु त्याचवेळी प्रतिस्पर्धींना गोल करण्यापासून रोखावे लागणार आहे. या पर्वाच्या अखेरच्या टप्प्यांत हिच गोष्ट निर्णायक ठरणार आहे,”असे बूथ्रोयड म्हणाले.
दुसरीकडे केरळा ब्लास्टर्सने सलग तीन विजयाची नोंद करताना तालिकेत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. मागील तीन पैकी दोन सामन्यांत त्यांनी क्लीन शीट राखली होती. मागच्या पर्वात केरळा ब्लास्टर्सने उपांत्य फेरीत जमशेदपूर एफसीला पराभूत केले होते आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा मानस आहे.
दिमित्रिओस डिएमांटाकोस याने केरळा ब्लास्टर्सच्या गतविजेत्या हैदराबाद एफसीविरुद्धच्या लढतीत एकमेव गोल केला होता. त्या गोलनंतर ग्रीकच्या खेळाडूला दुखापत झाली होती, परंतु तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. (Club Statistics)
”या लीगमध्ये कोणताही संघ कोणालाही हरवू शकतो आणि हिच गोष्ट लीगला मजेशीर बनवते. आमचे पुढील स्पर्धकही तुल्यबळ आहेत. आम्हीही सलग तीन पराभवानंतर विजयाची हॅटट्रिक साजरी केली आहे. दोन्ही संघ ३ गुणांसाठी कडवी टक्कर देतील, याची कल्पना आहे. मागील पर्वात त्यांच्याविरोधात आम्हाला संघर्ष करावा लागला होता,”असे मुख्य प्रशिक्षक इव्हान व्हुकोमोव्हिच म्हणाले.
या दोन संघांमध्ये १२ सामने झाले आणि त्यापैकी ७ सामने अनिर्णित राहिल्या आहेत. जमशेदपूरने तीन विजय मिळवले आहेत, तर केरळा ब्लास्टर्सने दोन वेळा बाजी मारली आहे. (Jamshedpur FC need a win; The challenge of Kerala Blasters in front of them on Sunday)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्ध ‘ही’ चूक नाही करणार भारतीय संघ, कर्णधार रोहित म्हणाला, ‘जिंकण्यासाठी…’
बांगलादेशला धक्क्यावर धक्के, ‘या’ गोलंदाजाच्या बाहेर जाण्याने रोहितची चिंता मिटली