सध्या यूएस मास्टर्स टी10 क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक माजी खेळाडू खेळताना दिसत आहे. शनिवारी स्पर्धेतील क्वालिफायर 2 सामना खेळला गेला. दरम्यान न्यूयॉर्क वॉरियर्स आणि टेक्सास चार्जर्स यांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. कॅलिफोर्निया नाईट्स संघ सलग दोन पराभावानंतर या स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, क्वालिफायर 2 सामन्यात खेळताना कॅलिफोर्निया संघाचा वरिष्ठ फलंदाज जॅक कॅलिस याने पुन्हा एकदा वादळी फलंदाजी केली.
47-year-old Kallis smashed 56* runs from just 22 balls including 2 fours & 6 sixes in US T10 League.
– What a cricketer, One of the Greatest ever. pic.twitter.com/qlii7V9efr
— Johns. (@CricCrazyJohns) August 27, 2023
अमेरिकेत प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत अनेक सक्रिय तसेच निवृत्त झालेले क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. यामध्ये क्रिकेट इतिहासातील सर्वकालीन महान अष्टपैलू जॅक कॅलीस हा कॅलिफोर्निया नाईट्स संघाचा भाग आहे. क्वालिफायर 2 सामन्यात सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपल्या दर्जेदार फलंदाजीचे दर्शन घडवले.
सलामीला फलंदाजीला आलेल्या कॅलिसने 22 चेंडूंचा सामना करताना 56 धावांची तुफानी नाबाद खेळी केली. यात दोन चौकार व सहा षटकारांचा समावेश होता. त्याच्या खेळामुळे कॅलिफोर्निया संघ 139 पर्यंत मजल मारू शकलेला. मात्र, टेक्सास संघाने मोहम्मद हफिजच्या 69 धावांच्या खेळीमुळे सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.
कॅलिसने या स्पर्धेत यापूर्वी देखील टेक्सास संघाविरुद्ध अशी एक खेळी केली होती. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहताना 31 चेंडूवर 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 64 धावा केलेल्या. सध्या 47 वर्षांच्या असलेल्या कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नऊ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली आहे. मात्र, असे असले तरी त्यांनी आपल्या फलंदाजीतील दर्जा टिकवून ठेवल्याचे दिसते. तो जगभरातील लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करत असतो.
(Jaques Kallis Hits 22 Ball Fifty In US Masters T10 League)
महत्वाच्या बातम्या-
बांगलादेशच्या खेळाडूबाबत धक्कादायक ब्रेकिंग! स्टार फलंदाज नाही घेणार श्रीलंकेसाठी भरारी, पण का?
हेडनने निवडली वर्ल्डकपसाठी टीम इंडिया! सॅमसनला संधी तर, हुकमी एक्का केला बाहेर