वनडे विश्वचषकात रविवारी (8 ऑक्टोबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लो स्कोरिंग सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, सुप्रसिद्ध जार्वो भारताची जर्सी घालून मैदानात घुसला. इंग्लंडचा हा क्रिकेट चाहता अशा प्रकारे लाईव्ह सामन्यात घुसण्यासाठी ओळखला जातो. असे असले तरी, वनडे विश्वचषक 2023 मध्ये हा त्याचा पहिला आणि शेवटचा सामना ठरला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांनी रविवारी चॅपकवर आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात एकमेकांविरुद्ध खेळून केली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पाहुण्यांचा संघ अवघ्या 199 धावा करून 49.3 षटकात सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या डावात जार्वो 69 (Jarvo 69) म्हणजेच डॅनियल जार्विस मैदानात घुसला. ग्राऊंड स्टाफची नजर चुकवून जार्वो या सामन्यात घुसला पण त्याला तत्काळ मैदानात बाहेर केले गेले. सोबच विश्वचषकातील पुढच्या सामन्यांमध्ये त्याला पुन्हा मैदानात घुसता येणार नाही, याची पूर्ण खात्री आता आयसीसीने घेतली आहे. जार्वोला संपूर्ण विश्वचषकादरम्यान मैदानात बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने रविवारी घडलेल्या या प्रकारानंतर घेतला. सोशल मीडियावर या निर्णयाविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
जार्वो स्वतःला भारतीय संघातील खेळाडू सांगतो आणि याच कारणास्तव रविवारी देखील तो भारतीय जर्सी घालून मैदानात घुसला होता. यापूर्वी 2021 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान त्याने एक-दोन नाही, तर तीन वेळा मैदानात घुसण्याचे धाडस केले होते. त्यातील एका सामन्यात जार्वो फलंदाजाचे संपूर्ण कीट घालून मैदानात आला होता. इंग्लंडमध्ये त्याने काही सामन्यांमध्ये असाच प्रकार केला आहे. हेडिंग्ले आणि लीड्स स्टेडियमवर जार्वोला आयुष्यभरासाठी बंदी घातली गेली आहे. (Jarvo 69 banned for all upcoming world cup matches !)
विश्वचषकातील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड
महत्वाच्या बातम्या –
भारताची धसमुसळी सुरुवात! रोहित-ईशान आणि श्रेयस खातेही न खोलता तंबूत
CWC 2023: चेपॉकवर ऑस्ट्रेलियाने टेकले गुडघे! टीम इंडियासमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान