इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वाल याने द्विशतक ठोकले. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने 214* धावांची अप्रतिम खेळी केली. जयस्वालने ताबडतोड खेळी करून आपल्या डावात 12 षटकार मारले. याच पार्श्वभूमीवर इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेट याने जयस्वालच्या खेळीची तुलाना बॅझबॉल क्रिकेटशी केली. पण नासिर हुसेन यांनी जयस्वाललाच घरचा आहेर दिल्याचे दिसते.
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी यजस्वालच्या बॅटमधून द्विशतक निघाले. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून बेन डकेट असे म्हणाला की, याचे खेळीचे श्रेय बॅझबॉल क्रिकेटला मिळाले पाहिजे. कारण याआधी कसोटी क्रिकेटमध्ये अशा प्रकारे आक्रमक खेळी पाहायला मिळत नव्हती. पण नासिर हुसेन यांच्या मते डकेटचे हे विधान निरर्थक आहे.
बेन डकेट जयस्वालच्या द्विशतकावर म्हणाला, “विरोधी संघाच्या खेळाडूंना अशा प्रकारे खेळताना पाहिल्यानंतर वाटते की यासाठी आम्हाला श्रेय मिळाले पाहिजे. कारण बाकिचेही आता कसोटी क्रिकेट वेगळ्या पद्धतीने खेळू लागले आहेत.”
डकेटत्या या विधानानंतर नासिर हुसेन मात्र चांगलेच नाराज झाले. त्यांनी स्काई स्पोर्ट्सवर बोलटाना म्हटले की, “जयस्वाल तुमच्याकडून शिकला नाहीये. त्याचे संगोपण ज्या पद्धतीने झाले, त्याला ज्या अडचणी आयुष्यात आल्या, त्यातून तो शिकला आहे. जर असे काही असेलच, तर तुम्ही त्याच्याकडे पाहा आणि शिका. सरफराज खान यानेही चांगला प्रभाव टाकला.”
दरम्यान, इंग्लंडविरुद्ध मायदेशात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळताना जयस्वालने इतर सर्वांपेक्षा सर्वाधिक धावा केल्या आहेत. पहिल्या तीन सामन्यांनंतर त्याने केलेल्या धावांची संख्या 525 पर्यंत पोहोचली. 109च्या सरासरीने त्याने या धावा केल्या असून दोन वेळा द्विशतक ठोकले आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा सलामीवीर बेन डकेट आहे. डकेटने 3 सामन्यातील 6 डावांमध्ये 47.5 च्या सरासरीने 288 धावा केल्या आहेत. (Jashwani Jaiswal didn’t learn to play from you, Nasir Hussain hits back at Ben Duckett)
महत्वाच्या बातम्या –
‘मी त्याला फोन केला पण…’, चहलला रिलीज केल्यानंतर आरसीबीमध्ये काय घडलं?
मलिंगावर वरचढ ठरला वानिंदू हसरंगा! बनला अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन