आयपीएल 2023 च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले. आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असलेल्या या दोन्ही संघातील सामना चांगला रंगला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर दिल्लीने सर्वबाद 172 धावा केल्या. दिल्ली सुस्थितीत असताना जेसन बेहरेनडॉर्फच्या षटकात मुंबईने चार बळी टिपत सामन्यात आपली बाजू भक्कम केली.
Four wickets in the penultimate over by Jason Behrendorff including a brilliant direct-hit 🔥🔥#TATAIPL | #DCvMI pic.twitter.com/CYbjXSdfR9
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2023
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. दिल्लीचे फलंदाज सुरुवातीपासून चाचपडताना दिसले. पियुष चावलाने दिल्लीची मधली फळी कापून काढली. एका बाजूने कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने संयमी अर्धशतक झळकावले. तर, अक्षर पटेल याने वेगवान अर्धशतक पूर्ण केले.
दिल्लीने 18 व्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 165 अशी धावसंख्या बनवली होती. अखेरच्या दोन षटकात फलंदाजीसाठी जम बसलेले अक्षर पटेल व डेव्हिड वॉर्नर हे हे मैदानावर होते. त्यावेळी हे षटक टाकण्यासाठी डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ हा आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अक्षर याला झेलबाद केले. त्यानंतर अभिषेक पोरेल याला एक धाव घेण्यात यश आले. तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नर हा झेलबाद झाला. चौथ्या चेंडूवर नवीन फलंदाज कुलदीप यादव याने एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहल वढेराने थेट फेक करत त्याला धावबाद केले. पाचवा चेंडू निर्धाव गेल्यानंतर अभिषेक पोरेल अखेरच्या चेंडूवर बाद झाला. अशाप्रकारे अचानक दिल्लीचा डाव घसरला.
त्यानंतर अखेरच्या षटकात नॉर्किए व मुस्तफिजुर रहमान यांनी सहा धावा केल्याने दिल्लीला 172 पर्यंत मजल मारली.
(Jason Behrendorff Four Wickets 19 th Over Changing Match Mumbai Indians V Delhi Capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला