---Advertisement---

मुंबईने आरसीबीकडून ट्रेड केला धाकड गोलंदाज; 2019 मध्ये संघाला बनविलेले चॅम्पियन

On: शनिवार, नोव्हेंबर 12, 2022 8:34 PM
Mumbai-Indians
---Advertisement---

एकीकडे टी20 विश्वचषक अंतिम टप्प्यात आला असताना जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचे बिगुल देखील वाजले आहे. आयपीएल 2023 साठी पहिला ट्रेड झाला असून, मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या जेसन बेहरेनडॉर्फ याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची घोषणा केली गेली.

आयपीएल 2023 साठी पहिली ट्रेडिंग विंडो सुरू आहे. या ट्रेडिंग विंडोद्वारे सर्व संघ इतर संघाकडून लिलावाव्यतिरिक्त खेळाडू परस्पर संमतीने आपल्याकडे घेऊ शकतात. या पहिल्या ट्रेडिंग विंडोचा कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत असेल. 15 नोव्हेंबर रोजी सर्व संघांना आपण रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. तत्पूर्वी या हंगामाच्या पहिल्या ट्रेडची घोषणा झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला बेहरेनडॉर्फ आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसेल. ‌

 

जेसन बेहरेनडॉर्फ याला मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने 75 लाख रुपये खर्च करून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. 2018 व 2019 मध्ये तो मुंबई इंडियन्स संघाचाच भाग होता. तर 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी तो खेळताना दिसलेला. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 5 सामने खेळताना पाच बळी मिळवले आहेत. तर, त्याने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर 9 टी20 सामने खेळलेत. नव्या चेंडूचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याला ओळखले जाते.

बेहरेनडॉर्फ मुंबई इंडियन्सचा भाग झाल्याने मुंबईच्या वेगवान गोलंदाज विभागाला धार येईल. मुंबईकडे यापूर्वीच भारताचा जसप्रीत बुमराह व इंग्लंडचा जोफ्रा आर्चर हे दिग्गज वेगवान गोलंदाज आहेत. तसेच, डॅनियल सॅम्स व बसिल थंपी त्यांच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाला मजबुती देतात.

(Jason Behrendorff traded from Royal Challengers Bangalore to Mumbai Indians)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दुसऱ्याच्या दु:खात सुख शोधता तुम्ही…’, भारताच्या इरफानने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर डागली तोफ, पण का?
आख्ख्या जगाने केले टीम इंडियाला ट्रोल, पण न्यूझीलंडच्या दिग्गजाकडून मिळाला सल्ला; म्हणाला, ‘धाडसी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---