अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी (०६ फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिला वनडे सामना (First ODI) पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ६ विकेट्सने हा सामना जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात पाहुण्या संघाकडून जेसन होल्डर (Jason Holder) याने एकाकी झुंज दिली. त्याने अर्धशतकी खेळी करत कसेबसे संघाला १५० धावांच्या पार नेले. परंतु इतर संघ सहकाऱ्यांकडून साथ न मिळाल्याने तो वेस्ट इंडिजला पराभवापासून थांबवू शकला नाही. मालिकेतील पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर अष्टपैलू होल्डरने (Jason Holder On West Indies Defeat) प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली होती. भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी त्याचा हा निर्णय योग्यही ठरवला. त्यांनी प्रत्येकी ४ आणि ३ विकेट्स घेत वेस्ट इंडिजच्या संघाला ४३.५ षटकात १७६ धावांवर सर्वबाद केले. होल्डरला वगळता वेस्ट इंडिजकडून होल्डरला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला साध्या ३० धावाही करता आल्या नाहीत.
संघाच्या अशा निराशाजनक प्रदर्शनावर प्रतिक्रिया देताना होल्डर म्हणाला की, “आम्हाला आमच्या विकेटचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. आम्ही खूप सहजतेने आमच्या विकेट्स गमावल्या. खरे तर अहमदाबादच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करणे आव्हानात्मक होते. परंतु ही फक्ते कारणे आहेत. मुळात आम्हाला चांगले प्रदर्शन करण्याची गरज आहे.”
दुर्देवाची बाब म्हणजे, वेस्ट इंडिजसारखा बलाढ्य संघ गेल्या १६ सामन्यांमध्ये १० वेळा ५० षटके पूर्ण न खेळता सर्वबाद झाला आहे. त्यातही सध्या त्यांच्या ताफ्यात डॅरेन ब्रावो, कायरन पोलार्ड, शाय होप, निकोलस पूरनसारखे फलंदाज आहेत. तरीही संघाकडून होत असलेल्या निराशादायी फलंदाजी प्रदर्शनावर होल्डर पुढे म्हणाला, “आमच्या वरच्या फळीतील फलंदाजांना मैदानावर तग धरून फलंदाजी करावी लागणार आहे. त्यांना त्यांच्या विकेटचे महत्त्व समजून घ्यावे लागणार आहे.”
वेस्ट इंडिजने ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गमावला असल्याकारणाने उर्वरित २ सामने जिंकत मालिका खिशात घालण्यावर त्यांची नजर असेल.
आपलेच दात आपलेच ओठ! सूर्यकुमारमुळे रिषभ पंत दुर्देवीरित्या धावबाद, जड मनाने परतला तंबूत
पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर दीपक हुडा झाला इमोशनल; म्हणाला, ‘विराट भैय्याकडून कॅप मिळणे…’
चहल यंदा दिसणार मुंबई इंडियन्सकडून खेळताना? रोहितबरोबरच्या त्या व्हिडिओनंतर चर्चांना उधान






