आयपीएल लिलावाच्या (IPL mega auction 2022) पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (१२ फेब्रुवारी) अनेक दिग्गज खेळाडूंवर बोली लागल्या. त्यांपैकीच एक म्हणजे वेस्ट इंडीज संघाचा अष्टपैलू जेसन होल्डर (Jason holder). आयपीएल लिलावाच्या पुर्वीच त्याच्या नावाची चर्चा सर्वत्र होत होती. राॅयल चॅंलेंजर्स बॅंगलोर संघाने तर अगोदरच जेसन होल्डरवर त्यांची नजर असल्याचे ट्वीट करत सांगितले होते. परंतु आरसीबीने मेगा लिलावात या खेळाडूवर बोली लावली नसून लिलावाात या खेळाडूसाठी इतर संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियंस, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स या संघांनी त्याच्यावर बोली लावली असून लखनऊ संघाने त्याला ८.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
ज्या खेळाडूंची मुळ किंमत १.५ कोटी ठेवली होती, त्यामध्ये त्याचा समावेश होता. त्याला या लिलावात ८ पट जास्त फायदा झाला आहे. त्याच्या आयपीयल कारकिर्दीत त्याने आत्तापर्यंत २६ सामने खेळले असून १८९ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ३५ विकेट सुद्धा घेतल्या आहेत.
जेसन होल्डरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाकडून खेळत केली आहे. २०१३ मध्ये त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. चेन्नईने २०१३ मध्ये होल्डरला २०,००० डाॅलर्सला विकत घेतले होते. त्याने चेन्नईसाठी ६ सामने खेळले होते. यामध्ये त्याने २ विकेट घेतल्या आणि त्याने एकही धाव काढली नव्हती.
नंतरच्या हंगामात तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला. त्यावेळी त्याला फक्त एक सामना खेळता आला असुन त्यामध्ये त्याने फलंदाजीत खाते खोलत केवळ १६ धावा केल्या. २०१५ मध्ये त्याने आयपीएलमध्ये सहभाग घेतला नाही. २०१६ मध्ये तो कोलकाता संघाकडून खेळला. त्याने या संघाकडून खेळतााना ४ सामन्यात २ विकेट्स घेतल्या. तसेच फलंदाजीत त्याने २२ धावा केल्या.
२०१७ पासून २०१९ पर्यंत तो एकही आयपीएल खेळला नाही. २०२० मध्ये तो आयपीएलमध्ये पुनरागमन करत हैदराबाद संघाकडून खेळला. यावेळी गोलंदाजीत तो खास कामगिरी करू शकला नाही. त्या हंगामात त्याने ७ सामन्यांमध्ये ६६ धावा केल्या आणि १४ विकेट्स घेतल्या. २०२१ मध्ये त्याने हैदराबाद संघासाठी दमदार कामगिरी केली होती. हैदराबादकडून ८ सामन्यात त्याने ८५ धावा केल्या आणि १६ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकन खेळाडू ठरलाय ‘वनिंदू हसरंगा’, घेतली भलीमोठी रक्कम
आता बटरलसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणा अश्विन! सेहवागने जुन्या वादाची काढली आठवण
‘ह्युज एडमिड्स’ कोसळल्यावर ‘या’ व्यक्तीने लढवला आयपीएल लिलावाचा किल्ला, जाणून घ्या नव्या ऑक्शनरबद्दल