मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत टी-20 लीगला जास्त महत्व देताना दिसले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळून मिळणाऱ्या पैशांपेक्षा लीग खेळून खेळाडू काही महिन्यांमध्येच कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय क्रिकेट बोर्डांपुढे नवीन आव्हाने उभी राहत आहेत. इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयल देखील राष्ट्रीय संघासोबत करार करू इच्छित नाही, असा बातम्या समोर येत आहेत.
यावर्षीपासून अमेरिकेत नवीन क्रिकेट लीग सुरू होत आहे. मेजर लीग असे या क्रिकेट स्पर्धेचे नाव आहे. माहितीनुसार जेसन रॉय (Jason Roy) मेजर लीगमध्ये लॉस ऍन्जलिस नाईट रायडर्स संघाकडून खेळू इच्छितो. यासाठी त्याला मोठा मोबदलाही फ्रँचायझीकडून दिला जाणार आहे. आधीपासून राष्ट्रीय संघासोबत करारबद्ध असल्यामुळे इंग्लंड क्रिकेट संघ खेळाडूंना यावर्षी मेजर लीगमध्ये खेळण्याची परवानगी देणार नाही, असे सांगितले जात आहे. जेसन रॉयदेखील इंग्लंड संघाचा करराबद्ध खेळाडू आहे. पण मेजर लीगमध्ये खेळण्यासाठी तो राष्ट्रीय संघासोबतचा करार मोडणार असल्याचेही सांगितले जात आहे. माहितीनुसार मेजरल लीगमध्ये लॉस ऍन्जलिस संघाकडून रॉयला दोन वर्षांच्या करारासाठी तब्बल 30 कोटींच्या करार मिळणार आहे.
अशात इंग्लंड क्रिकेट बोर्ड जर आगामी मेजर लीगसाठी खेळाडूंना परवानगी देत नसेल, तर नक्कीच खेळाडू स्वतःला राष्ट्रीय संघाच्या करारातून मुक्त करण्याच्या प्रयत्नात असतील. जेसन रॉय जर खरोखर राष्ट्रीय करार सोडण्याचा निर्णय घेतला असेल, तर आगामी विश्वचषकातूनही त्याला वगळण्यात येऊ शकते. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर माहिन्यात आयसीसी वनडे विश्वचषक खेलवला जाणार आहे. बीसीसीआय वनडे विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे. दुसरीकडे अमेरिकेतील मेजर लीग 13 ते 30 जुलैदरम्यान खेळवली जाणार आहे.
लीगमध्ये एकूण 6 संघ एकत्र खेळताना दिसतील. यात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फ्रँचायझींनी संघ खरेदी केले आहेत. सहा पैकी 4 संघ आयपीएल फ्रँचायझींनी घेतले आहेत. राहिलेले दोन संघ क्रिकेट विक्टोरिया आणि क्रिकेट न्यूज साउथ वेल्सने खरेदी केले आहेत. माहितीनुसार जेसन रॉयप्रमाणे वेगवान गोलंदाज रिस टोपली देखील स्वतःला राष्ट्रीय संघाच्या करारातून मुक्त करून घेणार आहे. पण मागच्याच महिन्या त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असल्याने हा निर्णय गोलंदाजाच्या फिटनेसवर अवलंबून असेल. (Jason Roy set to cancel his England contract to sign a contract for Los Angeles Knight Riders )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एलिमिनेटरमध्ये डी कॉकला बाहेर बसवण्यामागं होतं ‘हे’ मोठं कारण! वाचा कृणाल पंड्या काय म्हणाला
विराटच्या नावाने चिडवणाऱ्यांना नवीन उल हकने केले शांत; म्हणाला, ‘गौतम गंभीर दिग्गजच…’