भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई मध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. तसेच कर्णधार जो रूट याने जोरदार द्विशतकीय खेळी केली आहे. पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर जो रूट याने दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते की, इंग्लंड संघ ६०० ते ७०० धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता इंग्लंड संघ त्याच दिशेने वाटचाल करत आहे.
जसप्रीत बुमराहचा उत्कृष्ट यॉर्कर
कर्णधार जो रूट आणि बेन स्टोक्स दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट फलंदाजी करत होते. शाहबाज नदिम आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाजांनी चांगल्याच धावा कुटल्या. सर्वांना माहीतच आहे जसप्रीत बुमराह याला यॉर्कर स्पेशलिस्ट असे म्हंटले जाते. बुमराहने आपल्या यॉर्कर चेंडूवर अनेक मोठमोठ्या फलंदाजांना बाद केले आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळात बुमराह याने बेन स्टोक्स याला यॉर्कर चेंडू फेकला आणि तो चेंडू स्टोक्सला चकमा देत यष्टिरक्षकाच्या हातात गेला. तो चेंडू पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले होते की, स्टोक्स या चेंडूवर बाद कसा नाही झाला.
दुसऱ्या दिवशी इंग्लंड मजबूत स्थितीत
जो रूट याच्या जबरदस्त द्विशतकिय खेळीमुळे इंग्लंडने ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. यातच सिब्ली याच्या ८७ धावांचा तर बेन स्टोक्स याच्या ८२ धावांचा समावेश आहे. इंग्लंड संघाकडून कर्णधार जो रूट याने सर्वाधिक २१८ धावा केल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना शाहबाज नदीम , ईशांत शर्मा, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या:
नासिर हुसेन यांनी उधळली जो रूटवर स्तुतिसुमने, म्हणाले
कोणाचा कव्हर ड्राईव्ह सर्वोत्तम? आयसीसीने घेतलेल्या पोलमध्ये या खेळाडूला मिळाली सर्वाधिक मते
आयपीएल गाजवणाऱ्या एनरिच नॉर्टजेची पाकिस्तानविरुद्ध भेदक गोलंदाजी, पाहा व्हिडिओ