भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. त्यातील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे. कसोटीचा तिसरा दिवस इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या नावावर राहिला. रुटने शानदार फलंदाजी करत 180 धावांची नाबाद खेळी केली आणि इंग्लंडची धावसंख्या 400 च्या जवळ आणली. भारताच्या 364 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद 391 धावा केल्या.
ट्रेंट ब्रिजवर इंग्लडच्या फलंदाजाना थकवणारा जसप्रीत बुमराह लॉर्ड्सवर आपल्या लयीतून भरकटलेला दिसला. त्याला एकही विकेट मिळवता आली नाही, ज्याचा दबाव त्याच्या गोलंदाजीवरही दिसून आला. बुमराहने एकापाठोपाठ एक असे एकूण 13 नो-बॉल टाकले. बुमराहने इतके नो-बॉल टाकल्यावर चाहतेही आश्चर्यचकित झाले होते.
भारताने इंग्लंडच्या पहिल्या डावात एकूण 17 नो बॉल टाकले. त्यापैकी 13 नो बॉल एकट्या बुमराहने टाकले आहेत. बुमराहने 26 षटकांत आपल्या स्पेलमध्ये 79 धावा दिल्या. याशिवाय त्यास एकही बळी घेता आला नाही. बुमराहने सलग दोन षटकात, तीन-तीन नो बॉल टाकले. यॉर्कर गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा बुमराह लाईन लेंथपासून पूर्णपणे भरकटलेला दिसला. ज्यावर चाहत्यांनी त्याला जोरदार ट्रोलही केले आहे.
*Bumrah balls 2-3 normal deliveries*
Bowling crease line: pic.twitter.com/vgHLOqvbkT— गाभरु🚩 (@thoda_rude_hu) August 14, 2021
"17 No-Balls" were bowled by Indian bowlers in an inning. In this 13 are by bumrah🤐🥇#INDvENG #bumrah #noball pic.twitter.com/AuQjhqX3FO
— SP SINGH (@spsingh2375) August 14, 2021
#INDvENG
Bumrah – Friendship ended with Yorkers, No-balls are my new bestfriends pic.twitter.com/tyZ50eP6lO— Shivani (@meme_ki_diwani) August 14, 2021
https://twitter.com/Devil80005317/status/1426611162683043845?s=20
भारतासाठी ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांनी तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात चांगली गोलंदाजी केली आणि भारतीय संघाला सामन्यात परत आणले. सिराज 4 आणि इशांतने 3 ब्रिटिश फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
तिसऱ्या दिवसाचे पहिले दोन सत्र पूर्णपणे इंग्लंडच्या नावावर होते आणि भारतीय गोलंदाज विकेट्ससाठी झटताना दिसले. परिस्थिती इतकी बिकट होती की, लंच ब्रेकपर्यंत भारतीय संघाला एकही बळी मिळाला नव्हता. कर्णधार जो रूटने प्रथम जॉनी बेअरस्टो (57 धावा) सोबत चौथ्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो बाद झाल्यानंतर रूटने आपली चमकदार फलंदाजी सुरूच ठेवली आणि कसोटीतील 22 वे शतक झळकावले.
रूटने जोस बटलर (23 धावा) आणि मोईन अली (27 धावा) यांच्यासह अर्धशतकी भागीदारी करून भारताला पूर्णपणे पिछाडीवर ढकलले. इशांतने प्रथम बटलर नंतर मोईन अली आणि सॅम करन यांना सलग चेंडूवर बाद करून सामन्यात भारतीय संघाला परत आणले. मोहम्मद शमीने, जेम्स अँडरसनला खातेही उघडू न देता माघारी धाडले आणि इंग्लंडचा डाव संपवला.
महत्त्वाच्या बातम्या-
दुखापतग्रस्तांना पुन्हा संधी तर बदली खेळाडूंचे कटणार तिकीट; बीसीसीआयच्या निर्णयाने खेळाडू पेचात
एका ग्राउंड ऑफिसरने शमी, बेयरस्टोसहित पंचांनाही थकवलं, व्हिडिओ बघून आवरणार नाही हसू
जो रूटपुढे भारताची गोलंदाजी खिळखिळी, कर्णधार कोहलीच्या ‘त्या’ निर्णयाचे भारताला भोगावे लागणार फळ?