---Advertisement---

बूमबूम इज बॅक! लुईसला तंबूत धाडून युएईत केला मोठा कारनामा

On: बुधवार, ऑक्टोबर 6, 2021 12:02 AM
---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या ५१ व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने आले. हा सामना दोन्ही संघांसाठी करा किंवा मरा अशा असा होता. मात्र, मुंबई संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. मुंबईने राजस्थानचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयात मुंबई संघाच्या गोलंदाजांची महत्त्वपूर्ण योगदान राहिले. मुंबईचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दोन गडी बाद करत यूएईत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

बुमराह पोहोचला प्रथम क्रमांकावर

आयपीएलमध्ये यूएईत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर पोहचला आहे. याआधी आरसीबीच्या युजवेंद्र चहलने त्याची या विक्रमात बरोबरी केली होती. बुमराहने ४० बळी घेत पहिले स्थान पटकावले आहे तर चहल आता ३८ विकेट्स सह दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचा कगिसो रबाडा या यादीत ३५ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर असून, पंजाबचा मोहम्मद शमी ३३ विकेट्ससह चौथ्या स्थानी आहे. ट्रेंट बोल्ट आणि एन्रिक नॉर्किए २९ विकेट्ससह संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

मुंबईचा मोठा विजय

या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजानी भेदक गोलंदाजी करत राजस्थानच्या संघाला अवघ्या ९० धावांवर रोखले.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थान संघाने अतिशय खराब फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. राजस्थानकडून सर्वाधिक धावा सलामीवीर एविन लुईसने केल्या. तो २४ धावा करून बाद झाला. लुईस बाद झाल्यानंतर राजस्थानच्या एकाही फलंदाजाला मुंबईसमोर तग धरता आला नाही. कर्णधार संजू सॅमसन फक्त ३ धावा करुन बाद झाला. लुईसशिवाय यशस्वी जयस्वालने १२ धावा केल्या, मिलरने १५ धावा तर तेवतिया १२ धावा करून बाद झाला. श्रेयस गोपाल शून्य धावांवर परतला. इतर फलंदाज दुहेरी संख्याही गाठू शकले नाहीत. मुंबईकडून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. नॅथन कुल्टर नाईलने ४, जेम्स नीशामने ३ आणि बुमराहने २ विकेट्स घेतल्या.

मुंबईसमोर ९१ धावांचे सोपे लक्ष्य असताना मुंबईचा सलामीवीर कर्णधार रोहितने चांगली सुरुवात केली. पण तो २२ धावावर बाद झाला. त्याला चेतन सकारियाने बाद केले. त्यानंतर सूर्यकुमारही १३ धावा करुन बाद झाला. मुस्तफिजूरने त्याची विकेट घेतली. पण, सलामीवीर ईशान किशन मात्र एका बाजूने तुफानी फलंदाजी करतच राहिला. त्याने अवघ्या २५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार ठोकत ५० धावा केल्या आणि मुंबईला अवघ्या ८.२ ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---