इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १० गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. गोलंदाजीत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आणि अवघ्या २६ धावांवर आपले ५ विकेट गमावले.
विशेषत: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांची तारांबळ उडवली. १२ जुलै रोजी लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात बुमराहने ७.२ षटकांच्या गोलंदाजीमध्ये १९ धावा देत ६ बळी घेतले. यादरम्यान त्याने तीन ओव्हर मेडन्सही केल्या. कोणत्याही भारतीय गोलंदाजाने आपल्या देशात इंग्लंडविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
याआधी, ४ वर्षांपूर्वी त्याच दिवशी म्हणजेच १२ जुलै २०१८ रोजी कुलदीप यादवने नॉटिंगहॅम वनडेमध्ये इंग्लंडचा कहर केला होता. या सामन्यात कुलदीप यादवने इंग्लंडविरुद्ध अवघ्या २५ धावांत ६ विकेट घेतल्या होत्या. अशा प्रकारे १२ जुलै ही तारीख इंग्लंडसाठी वाईट स्वप्नासारखी ठरली.
या सामन्यात इंग्लंडचा संघ केवळ २५.२ षटकांची फलंदाजी करू शकला, ज्यामध्ये त्यांनी ११० धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक ३० धावांची खेळी खेळली. याशिवाय डेव्हिड विलीने २१ धावा केल्या, तर ब्रेडन केअर्सने १५ आणि मोईन अलीने १४ धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही.
त्याचवेळी या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि शिखरने नाबाद राहिले आणि संघाला १० गडी राखून विजय मिळवून दिला. रोहितने ५८ चेंडूत ७६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ५ षटकार आणि ४ चौकारही लगावले. त्याचवेळी धवनने ५४ चेंडूत ३१ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ४ चौकार मारले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयर्लंडला हरवत न्यूझीलंडने रचलाय विश्वविक्रम! ‘असा’ कारनामा करणारा जगातील एकमेव संघ
नाद नाय गड्या! एकदिवसीय मालिकेत धावा करण्याच्या यादीत विल्यमसन आणि पाँटिंगला मागे सारत रोहितच नंबर १
रोहितच्या खणखणीत षटकाराने चिमुकली जखमी, मग झाले असे काही जे जिंकेल तुमचे हृदय!