लंडन | इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने १० विकेट्सने विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजीतील जबरदस्त प्रदर्शनाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडला लोळवत मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. या सामन्यादरम्यान एक अशी घटनाही घडली, जिने सर्वांचे लक्ष वेधले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्या एका षटकाराचा जोरदार चेंडू छोट्या चिमुकलीला लागला, ज्यामुळे काही मिनिटांसाठी सामना थांबवण्यातही आला.
इंग्लंडच्या (ENG vs IND) १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहितने (Rohit Sharma) सलामीला येत झंझावाती अर्धशतक केले. ५८ चेंडू खेळताना त्याने ७६ धावांची (Rohit Sharma Half Century) खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ खणखणीत षटकार आणि ६ चौकार मारले. त्याच्या याच ५ षटकारांपैकी एका षटकाराचा चेंडू स्टेडियममध्ये उपस्थित चिमुकलीला (Little Girl Injured) लागला.
भारताच्या डावातील पाचव्या षटकादरम्यान ही घटना घडली. या षटकातील तिसऱ्या शॉट पिच चेंडूवर रोहितने पुल शॉट मारत षटकार खेचला. रोहित षटकार मारल्यानंतर वळला आणि नॉन स्ट्राईकवर असलेल्या धवनकडे जाऊ लागला. मात्र कॅमेरामनने सीमारेषेपर्यंत चेंडूचा पाठलाग केला. रोहितच्या षटकाराचा चेंडू सीमारेषेपलीकडे जाऊन स्टेडियममध्ये बसलेल्या दर्शकांमध्ये जाऊन पडला. तिथे असलेल्या एका छोट्या मुलीला हा चेंडू लागला आणि ती रडू लागली.
मग लगेचच त्या मुलीच्या जवळच्या लोकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. रोहित आणि इतर खेळाडू मैदानावरून हा प्रसंग पाहात होते. यामुळे काही मिनिटांसाठी सामना थांबवावा लागला. मग काही सेकंदांनी इंग्लंडचे फिजिओ मन मोठे करत त्या मुलीला तपासण्यासाठी धाव घेताना दिसले. त्यांच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Pull shot ???????? hope so that little girl is fine ???? pic.twitter.com/ytdu7q9BWO
— pariss (@paris45uk) July 12, 2022
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ २५.२ षटकात ११० विकेट्सवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या ११४ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर १८.४ षटकातच सामना जिंकला. रोहित शर्मासह जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हेदेखील भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराह आला, विषय संपला! इंग्लंडच्या ६ विकेट्स घेत दिग्गजांच्या यादीत सामील, नेहराला सोडले मागे
भारताने घेतलीये विश्वविजेत्यांची मज्जा! पहिल्या वनडेत हवेत उडणाऱ्या इंग्लंडला आदळलंय जमिनीवर
‘मला विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे…’, भारतीय संघात परतल्यानंतर शिखर धवनचे मोठे विधान






