इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात तीन वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना पार पडला. केनिंग्टन, द ओव्हल येथे झालेल्या सामन्यात भारताने यजमान संघाला २५.२ षटकातच सर्वबाद करत ११० धावांवर रोखले. हा सामना भारताने १० विकेट्स आणि १८८ चेंडू शिल्लक राखत जिंकला आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. त्याने १९ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या गोलंदाजीने आनंदीत झालेल्या अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी ट्वीट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्यातील माजी सलामीवीर वसीम जाफरचे मजेशीर ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. जाफरने ट्वीटमध्ये लिहिले, ‘एलेक्स प्लीज प्ले जसप्रीत बुमराह, यावर एलेक्साने उत्तर दिले, सॉरी जसप्रीत बुमराह अनप्लेबल आहे.’
"Alexa, please play Jasprit Bumrah"
"Sorry, Jasprit Bumrah is unplayable"#ENGvIND pic.twitter.com/HN7G9scrgx— Wasim Jaffer (@WasimJaffer14) July 12, 2022
जाफरच्या व्यतिरिक्त अमित मिश्रानेही ट्विटरचा अवलंब वापरला आहे. त्याने म्हटले, ‘इंग्लंडची भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या. जसप्रीत बुमराहला सलाम, तुने फक्त विश्वविजेत्या इंग्लंडलाच नाही तर इंग्लंडच्या त्या तज्ञ लोकांना बाद केले ज्यांनी भारताच्या येथिल कामगिरीवर शंका व्यक्त केली होती.’
Lowest ever score by England against India.
Take a bow Jasprit Bumrah, you not only bowled out the world champions but also those English experts who doubted India’s chances on a green top wicket. pic.twitter.com/AktolR8vww
— Amit Mishra (@MishiAmit) July 12, 2022
बुमराहची गोलंदाजी भारताकडून एखाद्या गोलंदाजाने इंग्लंडमध्ये केलेली ही सर्वोत्कृष्ठ कामगिरी ठरली आहे. त्याच्याआधी कुलदिप यादव (Kuldeep Yadav) याने २०१८मध्ये २५ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. तर बुमराहने त्याच्या वनडे कारकिर्दीत दुसऱ्यांदा पाच पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने जेसन रॉय, जो रुट आणि लियाम लिविंगस्टोन यांना शून्यावरच बाद केले आहे. त्यानंतर जॉनी बेयरस्टो, ब्रायडन कार्स यांनाही बाद केले आहे.
हा सामना भारताने १८.४ षटकाच जिंकला आहे. यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाबाद ७६ आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) याने नाबाद ३१ धावा केल्या आहेत. बुमराह बरोबरच मोहम्मद शमी यानेही महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याने ७ षटकात ३१ धावा ३ विकेट्स घेतल्या आहेत. भारताचा इंग्लंड विरुद्धचा पुढील सामना १४ जुलैला लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तैमूरला घेऊन ओव्हल वनडे पाहायला आला होता सैफ अली खान, स्टेडियममधील फोटोंनी वेधलंय लक्ष
आजपर्यंत टीम इंडियाला लाभलेले गुरु, ज्यांनी घडवला इतिहास
सर्वोत्तम बहुमान, जगातला नंबर ‘वन’! बुमराहची आयुष्यात कधीच विसरता न येणारी कामगिरी