भारतीय संघाचा पुढचा दौरा आयर्लंडला असेल. मंगळवारी (15 ऑगस्ट) भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यात जसप्रीत बुमराह भारताचा कर्णधार आहे. बुमराह मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करत आहे आणि चाहते त्याला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक दिसत आहेत. बुमराहच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून आयर्लंडसाठी रवाना होतानाच एक फोटो शेअर केला गेला आहे.
जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. पण आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याचे संघात पुनरागमन होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यात विश्रांती दिली गेली आहे. अशात बुमराह पुनरागमनासह थेट कर्णधार देखील बनला आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ मंगळवारी रवाना झाल्यानंतर बुमराहने पोस्ट केलेला फोटो चांगलाच चर्चेत आहे. चाहते यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.
https://www.instagram.com/p/Cv8x4BAK0Pk/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन भारतीय संघाच्या दृष्टीने आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी महत्वपूर्ण आहे. बुमराह आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अनेकदा भारतासाठी मॅच विनर ठरला आहे. आगामी वनडे विश्वचषकात देखील त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. असे असले तरी, जवळपास 11 महिन्यांच्या काळानंतर तो मैदानात परतणार आहे. अशात त्याला पूर्वीप्रमाणे लय लगेच मिळेलच, याची शक्यताही कमीच आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना सप्टेंबर 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. आयर्लंड दौऱ्यापूर्वी काही सराव सामन्यांमध्ये त्यांचे प्रदर्शन चांगले राहिल्यामुळे त्याला पुन्हा संघात निवडले गेले. आता भारतासाठी प्रत्यक्षात त्याची कामगिरी कशी राहते, हे पाहण्यासारखे असेल. (Jasprit Bumrah and other indian players fly for ireland to play t20i series watch pictures)
आयर्लंड दौऱ्यासाठी निवडलेला भारतीय संघ –
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, जितेश शर्मा, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, शिवम दुबे, शाहबाज अहमद, संजू सॅमसन.
महत्वाच्या बातम्या –
स्वातंत्र्यदिन विशेष: 1983 सालचा वर्ल्डकप ते 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, वाचा भारतीय क्रिकेटमधील सोनेरी क्षण
15 ऑगस्टला भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांचा लागलाय असा निकाल, फक्त एकदा मिळालाय विजय