जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या ( आयपीएल ) चौदाव्या हंगामाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मैदानात उतरताच मुंबईचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एका खास यादीत आपले नाव नोंदविले.
बुमराहचा नवा पराक्रम
आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील पहिल्या सामन्यात मैदानात उतरताना मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आयपीएलमध्ये आपला शंभरावा खेळला. यासह त्याने एका खास यादीमध्ये आपले नाव नोंदविले. पहिल्यापासून एकाच आयपीएल संघासाठी १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा तो अवघा पाचवा क्रिकेटपटू ठरला. विशेष म्हणजे या यादीमध्ये तीन खेळाडू हे मुंबई इंडियन्सचे सदस्य आहेत.
या खेळाडूंनी खेळले एकाच संघासाठी सर्वाधिक सामने
आयपीएलच्या इतिहासात फक्त एकाच संघासाठी १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये पहिल्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधार असलेला विराट कोहली आहे. विराटने आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत १९९ सामने खेळले आहेत. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्सचा उपकर्णधार कायरन पोलार्ड असून त्याने २०१० पासून १७१ सामन्यांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या यादीमध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे सुनील नरीन व लसिथ मलिंगा हे असून त्यांनी अनुक्रमे १२४ व १२२ सामने खेळले आहेत. आता या यादीमध्ये बुमराह सामील झाला आहे.
चेन्नईची खराब सुरुवात
आयपीएल उत्तरार्धाच्या या पहिल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा व अष्टपैलू हार्दिक पंड्या हे सहभागी झाले नाहीत. त्यामुळे मुंबईचे नेतृत्व कायरन पोलार्डने केले.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला सहा षटकात चार मोठे धक्के बसले. फाफ डू प्लेसिस व मोईन अली विना खाते खोलता माघारी परतले. रैना व धोनीदेखील केवळ ४ व ३ धावा काढून बाद झाले. मुंबईसाठी ऍडम मिल्ने व ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/ipl-2021-csk-vs-mi-live-chennai-super-kings-3-overs-3-out-7-runs/
https://mahasports.in/ipl-2021-csk-vs-mi-live-chennai-super-kings-3-overs-3-out-7-runs/
https://mahasports.in/ipl-2021-csk-vs-mi-live-chennai-super-kings-3-overs-3-out-7-runs/