दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सेंच्युरियनच्या (centurion) मैदानावर झाला. हा सामना भारताने सामन्याच्या ५ व्या दिवशी ११३ धावांनी जिंकला. दरम्यान, चौथा दिवसाच्या शेवटी असा काहीतरी प्रकार घडला होता. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, धावांचा पाठलाग करताना केशव महाराज (Keshav Maharaj) आणि डीन एल्गर (Dean Elgar) खेळपट्टीवर टिकून होते. त्यावेळी चौथ्या दिवसातील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी विराट कोहलीने (Virat Kohli) जसप्रीत बुमराहला (Jasprit bumrah) दिली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज केशव महाराज बाद होण्यापासून स्वतःचा बचाव करताना दिसून आला होता.
त्यावेळी त्याने पंचांकडे अंधुक प्रकाशाची तक्रार केली होती. ही गोष्ट विराट कोहलीच्या कानी पडली. त्यावेळी विराट कोहलीने जसप्रीत बुमराहला म्हटले की, “याला आत्ताच बाद करायचं, याला बाद करायचा आहे.” मग काय, कर्णधाराने आदेश दिला आणि कर्णधाराने दिलेल्या आदेशाचे पालन करत जसप्रीत बुमराहने केशव महाराजला त्रिफळाचित करत माघारी धाडले.(Jasprit bumrah clean bowled Keshav Maharaj)
https://twitter.com/Nitinx18/status/1476226994756993024?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1476226994756993024%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Find-vs-sa-1st-test-jasprit-bumrah-out-keshav-maharaj-virat-kohli-2027966
https://twitter.com/Virat18Stan/status/1476469907873095693
विराट कोहली हा मैदानावर नेहमी आक्रमक भूमिकेत असतो, कदाचित याच आक्रमक भूमिकेमुळे केशव महाराज दबावात आला आणि तो बाद होऊन माघारी परतला. त्याने या डावात १९ चेंडूंमध्ये ८ धावांची खेळी केली. तसेच जसप्रीत बुमराहने या सामन्यात ५ गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
टीम इंडियासाठी ‘पुढील वरीस मोक्याच’! टी२० विश्वचषकासह खेळणार ‘या’ महत्वाच्या मालिका
नव्या आयसीसी क्रमवारीत अश्विनने उंचावला टीम इंडियाचा झेंडा; रोहित-विराट ‘या’ क्रमांकावर
हे नक्की पाहा : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट