भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील पाचवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांच्याकडून सलामीला मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर उतरले होते. मात्र, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भेदक गोलंदाजीने आपल्या दुसऱ्याच षटकात मार्शला बाद केले. यावेळी त्याला एकही धाव करता आली नाही. तो शून्यावर तंबूत परतला. विराट कोहली याने त्याचा अफलातून झेल घेतला. (Jasprit Bumrah gets Mitchell Marsh Virat Kohli takes a sharp catch diving to his left IND vs AUS CWC23)
झाले असे की, जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसरे आणि वैयक्तिक दुसरे षटक टाकत होता. यावेळी बुमराहचा पहिला चेंडू मिचेल मार्श याने निर्धाव खेळला. त्यानंतर बुमराहने दुसरा चेंडू टाकण्यासाठी आला असता मार्शच्या बॅटची कड घेत चेंडू मागील दिशेला गेला. यावेळी स्लीपमध्ये विराट कोहली उभा होता. विराटने त्याच्या डाव्या बाजूला झेप घेत अफलातून झेल पकडला. यामुळे मार्शला खाते न खोलता तंबूचा रस्ता पकडावा लागला.
Jasprit Bumrah strikes for India….!!!
What a catch by King Kohli. pic.twitter.com/O9Fm6CIP5b
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 8, 2023
मिचेल मार्श या सामन्यात 6 चेंडू खेळून शून्यावर तंबूत परतला. मार्श बाद झाला, तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 1 बाद 5 धावा इतकी होती.
विश्वचषक 2023 स्पर्धेतील पाचव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड (Australia have won the toss and have opted to bat Against India World Cup 2023)
हेही वाचा-
IND vs AUSच्या वर्ल्डकप अभियानाला सुरुवात! टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, पाहा तगडी प्लेइंग XI
क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी! भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी BCCIने उचललं मोठं पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय