भारतीय संघात निवड झालेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराकडून आपल्याला मोलाचे मार्गदर्शन मिळेल असे भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहाचे मत आहे.
भारतीय संघाची उद्यापासून ऑस्ट्रेलिया संघाबरोबर टी २० सामन्यांची मालिका सुरु होत आहे. त्याचनिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत जसप्रीत बुमराह बोलत होता.
त्याला आशिष नेहरा विषयी विचारल्यावर तो म्हणाला
तो खूप अनुभवी खेळाडू आहे. आम्ही टी २० विश्वचषकातही एकत्र खेळलो होतो. मला त्याच्याबरोबर खेळायला मजा येते. माझ्यासारख्या युवा खुळाडूंसाठी तो खूप मदत करणारा आहे.
बुमराह त्याच्या सहकारी गोलंदाजांबद्दल बोलताना म्हणाला की
आम्हाला आमचा खेळ सुधारायचा आहे; म्हणून आम्ही सतत एकमेकांना प्रश्न विचारात असतो. आम्ही वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आमची गोलंदाजी सुधारण्यासाठी आमच्या वरिष्ठ खेळाडूंनाही प्रश्न विचारतो. आम्ही परिणामांवर जास्त लक्ष देत नाही.
त्याला विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना तो म्हणाला
जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळाता तेव्हा तुम्हाला बाकी कशाची गरज नसते कारण तुम्ही खूप आनंदी असता. कोणत्याही प्रकारात तुम्हाला तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व करायला आवडत. जेव्हापण तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुमच्यावर जबाबदारी असते आणि तुम्हाला ती पेलावी लागते.
तो पुढे म्हणाला
वनडे आणि टी २० प्रकारात थोडाफार फरक असतो पण,मी ज्याठिकाणी गोलंदाजी करतो ती परिस्थिती सारखीच असते कारण ती अंतिम षटके असतात
सध्याच्या टी २० क्रमवारीत जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि भारतीय संघातील महत्वाच्या वेगवान गोलंदाजांमध्ये तो आहे.
उद्या भारताचा पहिला सामना धोनीच्या घराच्या मैदानावर रांचीला होणार आहे.