भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सिडनी कसोटीला सुरू होण्याच्या एक दिवस आधी कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी झाली होती. त्याच्या जागी आता जसप्रीत बुमराह टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतानं पर्थ येथील पहिली कसोटी 295 धावांनी जिंकली होती.
रोहित शर्माला वगळल्याचा मुद्दा काल बराच चर्चेत राहिला. आज जसप्रीत बुमराहनं यावर वक्तव्य केलं आहे. सिडनी कसोटीत भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिडनी क्रिकेट ग्राउंडच्या इतिहासावरून असं दिसून येतं की येथे प्रथम फलंदाजी करणं चांगलं आहे.
टॉसच्या वेळी जसप्रीत बुमराह रोहित शर्माबाबत बोलताना म्हणाला, “आम्ही पराभवातून धडा घेतला आहे. आम्हाला या सामन्यात आणखी चांगली कामगिरी करायला आवडेल. आमचा कर्णधार रोहित शर्मानं लीडरशीप दाखवत या सामन्यातून विश्रांती घेतली. यावरून दिसून येतं की संघामध्ये किती एकता आहे. येथे अहंकार नावाची गोष्ट नाही. आम्ही संघाच्या हितासाठी प्रयत्न करू.”
रोहित शर्मा ड्रॉप झाल्यामुळे केएल राहुलनं सिडनी कसोटीत सलामी दिली. तर शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी परतला आहे. सिडनी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की, वेगवान गोलंदाज आकाशदीपला पाठदुखीचा त्रास होत आहे. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली.
पहिले असं सांगण्यात आलं होतं की, रोहित शर्मानंच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांना सिडनी कसोटीतून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर असा अहवाल समोर आला की, बीसीसीआयच्या एका सन्माननीय सदस्यानं गंभीरला सिडनी कसोटीत रोहित शर्माला खेळवण्याची विनंती केली होती, मात्र प्रशिक्षकानं ही मागणी फेटाळून लावली.
हेही वाचा –
“त्याने आपला शेवटचा …”, रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल दिग्गजाचा मोठा दावा
दुधातील माशी प्रमाणे रोहितला बाहेर काढले, यादीत राखीव खेळाडू म्हणूनही नाव नाही
वारंवार तेच.! विराट कोहलीची पुन्हा तीच चुकी, सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही फ्लाॅप