भारताचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्यानं अनेक वेळा एकट्याचा दम दाखवत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं आहे. डेथ ओव्हर आणि यॉर्कर स्पेशलिस्ट बुमराहचे अनेक दिग्गज फलंदाजांनी जगातील सर्वात कठीण आणि धोकादायक गोलंदाज म्हणून वर्णन केलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात बुमराहला विचारण्यात आलेल्या प्रश्वावर त्यानं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) शेवटच्या टी20 विश्वचषकामध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. टी20 विश्वचषकात बुमराहने धमाकेदार गोलंदाजी करत भारताच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली. कदाचित बुमराह जगातील अशा काही गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याचा यॉर्कर बॉल खेळणे सर्वात कठीण आहे, जे आपण सतत पाहत आलो आहोत.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान बुमराहनं गोलंदाजी करण्यासाठी सर्वात कठीण फलंदाज कोण? या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “मला खरोखरच चांगले उत्तर द्यायचे आहे, पण प्रत्यक्षात गोलंदाजी करताना कोणत्याही फलंदाजाची भीती माझ्या मनात असू नये असे मला वाटते. मी साहजिकच सर्वांचा आदर करतो, पण एक गोलंदाज म्हणून मी नेहमी स्वत:ला सांगतो की, जर मी माझे काम चांगले केले तर मला रोखणारे जगात कोणी नाही. मी माझ्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करण्यापेक्षा स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो.”
— DeepTake II (@DeepTakeBackUp) August 29, 2024
बुमराहचं वय सध्या 30 वर्ष 268 दिवस आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं भारतासाठी 36 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 70 टी20 सामने खेळले आहेत. 36 कसोटी सामन्यात त्यानं 159 विकेट्स घेतल्या आहेत. 89 एकदिवसीय सामन्यात 149 विकेट्स घेतल्या आहेत, तर 70 टी20 सामन्यात त्यानं 89 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहच्या नावावर 397 विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दोन तासांत पदकांचा पाऊस, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये देशाला चाैथे पदक
गांगुलीनं सेहवागला दिली होती कारकीर्द संपवण्याची धमकी…!
फलंदाजानं लगावला चौकार अन् सूर्यानं मागितली माफी, कारण काय?