भारताच्या कसोटी संघाचा प्रभारी कर्णधार जसप्रीत बुमराह याने पाचव्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस (०२ जुलै) गाजवला. रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांच्या शानदार शतकी खेळींनंतर डावाच्या शेवटी बुमराहने टी२० स्टाईल फलंदाजी केली. त्यातही त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याची धु धु धुलाई करत सर्वांना २००७ च्या टी२० विश्वचषकाची आठवण करून दिली.
भारताच्या डावातील ८४ व्या षटकात बुमराह (Jasprit Bumrah) आणि स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) यांचा आमना सामना झाला. या षटकापूर्वी बुमराह विकेट वाचवून फलंदाजी करत होता. मात्र अचानक त्याने गियर बदलला आणि निर्भीड फटकेबाजी करायला सुरुवात केली. ब्रॉडच्या या षटकाची सुरुवातच बुमराहने चौकारासह केली. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या जॅक क्राउलने त्याचा चौकार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला.
त्यानंतर दबावाखाली आलेल्या ब्रॉडच्या हातून ५ वाईड चेंडू फेकले गेले, ज्याच्या अतिरिक्त ५ धावा भारतीय संघाच्या खात्यात जमा झाल्या. पुढे पुन्हा ब्रॉडने तोच चेंडू नो बॉल फेकला, ज्यावर बुमराहने टॉप एजवर खणखणीत षटकार टोलवला. चांगली सुरुवात मिळाल्याने आत्मविश्वास वाढलेल्या बुमराहने पुढील सलग ३ चेंडूंवर चौकार ठोकले. पाचव्या चेंडूवर पुन्हा एकदा त्याने नेत्रदीपक षटकार ठोकला. मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूला तो सीमारेषेबाहेर पाठवण्यात अपयशी ठरला.
मात्र एका षटकात ३५ धावा जमा करत (35 Runs In An Over) त्याने ब्रॉडच्या नावावर मात्र नकोशा विक्रमाची नोंद करून टाकली. ब्रॉड कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज बनला आहे. सोशल मीडियावर या चित्तथरारक षटाकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
The most expensive over in Test cricket history – Jasprit Bumrah the man! pic.twitter.com/7G5BvcYVOz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 2, 2022
स्टुअर्ट ब्रॉडची यापूर्वीही भारतीय फलंदाजांनी केली धुलाई
दरम्यान यापूर्वीही भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने स्टुअर्ट ब्रॉडचा घाम काढला होता. डर्बन येथे झालेल्या २००७ टी२० विश्वचषकातील एका सामन्यात युवराजने ब्रॉडच्या एका षटकात सलग ६ षटकार ठोकत ३६ धावा जोडल्या होत्या. यानंतर आता कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने ब्रॉडला दिवसा चांदणे दाखवले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहने धुतल्यानंतर पिटरसनचा ब्रॉडला टोमणा! म्हणाला, ‘माझा विक्रम मोडल्यामुळे…’
भारताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करण्यापूर्वीच जो रुटने रचलाय इतिहास! जाणून घ्या सविस्तर
पंत आणि जडेजाने काढला इंग्लंडचा घाम, एकाच डावात शतके ठोकत १५ वर्षांच्या कामगिरीची पुनरावृत्ती