इंग्लंड विरुद्ध भारत संघातील पहिल्या वनडे सामना भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने गाजवला. त्याने पहिल्या षटकापासूनच धारदार गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजी फळीचे कंबरडे मोडले. त्याच्या गोलंदाजी योगदानामुळे भारतीय संघाने या सामन्यात इंग्लंडवर १० विकेट्स राखून सोपा विजय मिळवला. एकीकडे बुमराहने इंग्लंडच्या फलंदाजांना सतवले, तर दुसरीकडे बुमराहची पत्नी संजना गणेशन हिनेही त्यांची मजा घेतली आहे.
पहिल्या वनडे सामन्यानंतर बुमराहची पत्नी (Jasprit Bumrah’s Wife) आणि प्रसिद्ध अँकर संजना गणेशनने (Sanjana Ganeshan) इंग्लंडच्या खेळाडूंना चांगलेच ट्रोल केले. संजना एक क्रिडा अँकर आहे आणि तिने आपल्या अँकरिंगच्या अंदाजातच इंग्लंडच्या खेळाडूंची मजा घेतली. इंग्लंडमधील लंडन येथे असलेल्या क्रिस्पी डक या दुकानावरून संजनाने इंग्लंडच्या खेळाडूंना टोमणा मारला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही तिच्या व्हिडिओला पसंती दर्शवत आहेत.
व्हिडिओत संजना म्हणताना दिसत आहे की, “येथील खाद्य क्षेत्र खूप व्यस्त आहे. खासकरून हे इंग्लिश चाहत्यांनी भरलेले आहे. कारण ते क्रिकेट सामना पाहू इच्छित नाहीयेत. तसेच येथे खूप शानदार दुकानेही आहेत. येथे हॉट डॉग आणि टिपिकल सामना दिवसाचे खाद्य उपलब्ध असते. आम्ही येथील एका दुकानाजवळ आलो आहोत, जिथे इंग्लंडच्या अधिकतर फलंदाज यायला आवडणार नाही. या दुकानाला क्रिस्पी डक म्हणतात.”
“आमच्याकडेही एक ‘डक रॅप’ (खान्याचा एक पदार्थ) आहे. आम्ही बघू इच्छितोय की, मैदानाबाहेरचा हा ‘डक’ किती चांगला आहे. कारण मैदानाच्या आतील डक तर खूपच शानदार राहिलाय,” असे पुढे संजनाने म्हटले.
While our bowlers bagged some 🦆s on the field, @SanjanaGanesan 'wrap'ped up some 🦆s off the field at #TheOval 😋#ENGvIND #SonySportsNetwork pic.twitter.com/SzzQ9dVEaJ
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 12, 2022
दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज बुमराहने इंग्लंडच्या तब्बल ६ फलंदाजांना बाद केले. ७.२ षटके फेकताना त्याने केवळ १९ धावा देत या विकेट्स घेतल्या. सर्वप्रथम त्याने इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला शून्यावर बाद केले. त्यानंतर जो रूटलाही शून्यावर तंबूत धाडले. मग जॉनी बेयरस्टो (०७ धावा) आणि लियाम लिविंगस्टोन (० धावा) यांनाही त्याने आपले शिकार बनवले. डेविड विली आणि ब्रेडन कर्स यांनाही त्याने आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यात फसवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘एलेक्सा, प्लीज प्ले जसप्रीत बुमराह’, भारताच्या माजी क्रिकेटपटूच ट्वीट होतंय व्हायरल
तैमूरला घेऊन ओव्हल वनडे पाहायला आला होता सैफ अली खान, स्टेडियममधील फोटोंनी वेधलंय लक्ष
हे नवीनच! टॉवेलमुळे गोलंदाजाच्या मेहनतीवर फिरले पाणी, बाद झालेला फलंदाज राहिला नाबाद