भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीशी झुंज देत आहे. बुमराहने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळला होता. मागच्या जवळपास 6-7 महिन्यांपासून त्याहत्यांना बुमराह एकही क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसला नाहीये. पण लवकरच चाहत्यांची ही प्रतिक्षा संपणार असल्याचे दिसते. रहाणेने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून तसे संकेतरच दिले आहेत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघाचे सर्वात महत्वाचे शस्त्र आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्याने आतापर्यंत संघाला अनेकदा अडचणीच्या काळात विजय मिळवून दिला आहे. सोबतच पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठीही त्याची भूमिका महत्वाची राहिली आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध हैदराबादमध्ये आपला सेवटचा टी-20 सामना खेलल्यानंतर त्याने अनेक मालिकांमधून माघार घेतली. यादरम्यान भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका खेळल्या. पण या सर्व मालिकांमध्ये संघाला बुमराहनची कमी जाणवली. दरम्यानच्या काळात बुमहार एका मोठ्या शस्त्रक्रियेलाही सामोर गेला.
बुमराहच्या अनुपस्थिती भारतीय संघाप्रमाणेच आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सलाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्ससाठी इंंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील एकही सामना बुरमहाला खेळता आला नाही. बुमराहसोबतच मुंबईचा जोफ्रा आर्चर देखील दुखापतीमुळे आयपीएल हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतला. असात संघ कसाबसा प्लेऑफपर्यंत पोहोचला. पण, क्वॉलिफायर दोनमध्ये शुक्रवारी (26 मे) त्यांना गुजरात टायटन्सने पराभूत केले. या सामन्यातील पराभवानंतर मुंबईचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी बुमराहची संघाला कमी जाणवली, असेही म्हटले. असे असले तरी, बुमराह लवकरच मैदानात पुनरागमन करणार आहे, याचे संकेत त्याने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमधून दिले आहेत.
https://www.instagram.com/p/CsvzrL-KHuq/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
या पोस्टमध्ये बुमराहने आपले गोलंदाजीचे शुट शेअर केले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “नमस्कार मित्रांनो, आपण पुन्हा भेटू.” बुमराहच्या या पोस्टमुळे त्याचे चाहते भलतेच खुश असल्याचे पाहायला मिळत आहेत. पोस्टवर चाहत्यांच्या एकापेक्षा एक कमेट्स पाहायला मिळत आहेत. चाहत्यांना जरी बुमराहच्या पुनरागमनाची आतुरता असली, तरी भारतीय संघ व्यवस्थापन यासाठी कुठलीही घाई करणार नाही असेच दिसते. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बीसीसीआय आयसीसी वनडे विश्वचषकाचे जयमानपद भूषवणार आहे. भारतात खेलल्या जाणाऱ्या या प्रमुख स्पर्धेसाठी बूमिराह मागच्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या फिटनेसवर काम करत आहे. अशात त्याआधी तो मैदानात दिसण्याची शक्यताही फारच कमी आहे. (Jasprit Bumrah will soon make a comeback to the Indian team after an injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेन्नईच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून हार्दिकसेनेला धोका! फायनलमध्ये चमकले तर गुजरातच्या स्वप्नाचा होईल चुराडा
सेहवागने निवडले हंगामातील सर्वोत्तम 5 फलंदाज, यादीतून गिल-विराट बाहेर