राजकोटमध्ये भारतीय संघाने इंग्लंडला 434 धावांनी मात दिली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा तिसरा सामना होता, जो भारताने मोठ्या अंतराने जिंकला. उबय संघांतील या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये कमाल केली. राजकोट कसोटीत इंग्लंड संघ ज्या पद्धतीने पराभूत झाला, त्यावरून बॅझबॉल क्रिकेटवर सर्वत्र प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही बॅझबॉल क्रिकेटची मजा घेतली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम याचे टोपण नाव ‘बॅझ’ आहे. ब्रँडन मॅक्युलमने न्यूझीलंडसाठी खेळताना एकापेक्षा एक शॉट्स खेळायचा. न्यूझीलंड क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी त्याची एक ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने इंग्लंडच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आणि इंग्लंड संघाचे चोहरामोहरा बदलायला सुरुवात झाली. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या संयमी खेळीसाठी ओळखला जाणारा संघ मँक्युलमच्या मार्गदर्शनात कसोटी क्रिकेटमध्येही वनडे क्रिकेटप्रमाणे मारधाड फलंदाजी करू लागला. यामुळेच त्याला बॅझबॉल क्रिकेट असे म्हटले जाते.
अनेकदा त्यांचा निडर खेळ विरोधी संघाला महागात पडला. पण मागच्या दोन सामन्यांमध्ये त्यांची बॅझबॉल नीती भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे मोडकळीला आणली. राजकोट कसोटीच्या शेवटच्या डावात इंग्लंडला 557 धावा हव्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी त्यांना अवघ्या 122 धावांवर सर्वबाद केले. राजकोट कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडच्या डावातील 11व्या षटकात जसप्रीत बुमराह याने इंग्लिश फलंदाजांची मजा घेतली. व्हायरल व्हिडिओत बुमराह म्हणत आहे की, “आता हे मारतच नाहीत.” बुमराहचे हे एक वाक्य इंग्लंड संघाची नाचक्की करणारे ठरत आहे. सोशल मीडियावर बुमराहचा हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला असून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, उभय संघांतील या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिल्या सामन्यात बॅझबॉलचा प्रभाव पाहायला मिळाला होता. परिणामी भारताला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभव मिळाला. पण मागच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना बॅझबॉलचा प्रभवा रोखण्याची पद्धत समजली आहे, असेच वाटते. मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारी रोजी रांचीमध्ये सुरू होईल. (Jasprit Bumrah’s on England’s poor performance)
महत्वाच्या बातम्या –
आश्रमात दर्शनासाठी आलेल्या राहुलला चाहत्यांनी घेरले, पाहा आई-वडिलांना कशी काढून दिली वाट
IPL 2024 आधी चमकलं दुष्मंथा चमीराचं नशीब! केकेआरच्या इंग्लिश गोलंदाजाला केले रिप्लेस