इंग्लंड विरुद्ध भारत संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 31 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे खेळला नव्हता. तसेच तो 9 आॅगस्टपासून लॉर्ड्सवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता आहे.
बुमराहचा डावा अंगठा जून महिन्यात पार पडलेल्या आयर्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्याला इंग्लंड विरुद्धच्या टी20 आणि वनडे मालिकेलाही मुकावे लागले होते.
त्यानंतर बुमराहची 1 आॅगस्ट पासून सुरु झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड बुमराह दुसऱ्या सामन्यापासून फिट असेल या आशेने करण्यात आली आहे.
परंतू क्रिकेटनेक्स्टने दिलेल्या वृत्तानुसार बुमराहला पूर्ण बरा होण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे.
असे असले तरी बुमराहने नेटमध्ये गोलंदाजी सरावाला सुरुवात केली आहे. पण संघ व्यवस्थापक त्याला पूर्ण बरा होण्याआधी अंतिम 11 जणांच्या संघात खेळवण्याचा धोका पत्करु इच्छित नाही.
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हे तीन वेगवान गोलंदाज खेळले होते. पण जर बुमराह 11 जणांच्या संघात आला तर या तिघांपैकी एकाला बाहेर बसावे लागण्याची दाट शक्यता आहे.
तसेच याआधीच भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे पहिल्या तीन कसोटी सामन्यासाठी संघाच्या बाहेर आहे.
इंग्लंड – भारत यांच्यात दुसरा सामना होत असलेल्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारताने 2014 मध्ये झालेला कसोटी सामना जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघ यावेळीही तो इतिहास पुन्हा घडवण्यासाठी उत्सुक असेल.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: तर अँडरसन दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नसता
–इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो; जो रुट नव्हे, विराटच भारी
–कर्णधार कोहलीला ट्रोल करणे आयसीसीच्या चांगलेच अंगलट