पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनी वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज सर व्हीव रिचर्ड्स यांच्याबद्दल एक खास किस्सा सांगितला आहे. रिचर्ड्स यांची जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना होते. त्यांच्याबद्दल माहिती नसणारे खूप कमी लोक आहेत.
पाक पॅशनने दिलेल्या वृत्तानुसार रिचर्ड्स यांच्याबद्दलचा किस्सा सांगिताना मियाँदाद म्हणाले की ‘काही खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल काही बोलण्याची गरज नसते. जेव्हा ते मैदानात कामगिरी करतात तेव्हा सर्व जग त्यांच्याबद्दल चर्चा करत असते. एकदा एका लहान मुलाने व्हीव रिचर्ड्स यांना विचारले, तूम्ही कोण आहात. त्यांनी त्याला उत्तर दिले की वाचनालयात जा आणि माझ्याबद्दलची माहिती शोधून काढ.’
याबरोबरच मियाँदादने असाही खुलासा केला की ते जेव्हा खराब कामगिरी करतात तेव्हा वृत्तपत्र वाचत असे. ते म्हणाले, ‘जेव्हा तूम्ही सकाळी उठता आणि तूमच्याबद्दल लोक काय बोलत आहेत, हे पहाण्यासाठी वृत्तपत्र वाचता. तेव्हा तूम्ही ते सर्व सकारात्मक दृष्टीने समजून घ्यायचे असते. जेव्हा मी चांगली कामगिरी करायचो तेव्हा मी वृत्तपत्र वाचत नसे कारण मला माहित असायचं त्यात सर्व माझ्याबद्दल चांगले लिहिलेले असेल.’
पुढे मियाँदाद म्हणाले, ‘जेव्हा तूम्ही खराब कामगिरी करता तेव्हा तूम्ही लोक तूमच्याबद्दल काय बोलतात हे पहाण्यासाठी वृत्तपत्र वाचायला हवे. हे लेख वाचल्यानंतर आपले कुटुंब आपल्याबद्दल काय विचार करीत आहे हे देखील माहित असले पाहिजे. मी त्यावर लक्ष ठेवत असे.’
ट्रेंडिंग घडामोडी-
–तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
–जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर
–राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा