टीम इंडियानं अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित टी20 विश्वचषक 2024 जिंकत इतिहास रचला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं तब्बल 17 वर्षांनंतर ट्रॉफीवर कब्जा केला आहे. मात्र फायनल सामन्यानंतर हिटमॅननं सर्वात धक्का देत टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता तो भारतासाठी टी20 खेळताना दिसणार नाही.
जेव्हापासून रोहित शर्मानं ही घोषणा केली, तेव्हापासून अन्य दोन फॉरमॅटमध्ये त्याचं कर्णधारपद किती काळ टिकेल? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत मोठी घोषणा केली. ही घोषणा ऐकून रोहितच्या चाहत्यांना खूप आनंद होणार आहे.
जय शाह यांनी टीम इंडिया 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपही जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. जय शाह यांनी घोषित केलंय की, 2025 मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल.
बीसीसीआयनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये जय शाह म्हणाले, “गेल्या विश्वचषकात आपण सलग 10 सामने जिंकून सर्वांची मनं जिंकली, पण चषक जिंकू शकलो नाही. मी राजकोटमध्ये म्हटलं होतं की, 29 जूनला आपण चषक जिंकू. आता आपल्या कर्णधारानं बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवला. या विजयानंतर आगामी आयसीसी स्पर्धां – वर्ल्ड टेस्ट फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन होईल असा मला विश्वास आहे”.
#WATCH | BCCI Secretary Jay Shah congratulates the Indian cricket team on winning the ICC T20 World Cup
He says, “…I am confident that under the captaincy of Rohit Sharma, we will win the WTC Final and the Champions Trophy…”
(Source: BCCI) pic.twitter.com/NEAvQwxz8Y
— ANI (@ANI) July 7, 2024
भारतीय संघानं 2023 एकदिवसीय विश्वचषकात सलग 10 विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. परंतु फायनलमध्ये संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर टी20 विश्वचषक 2024 पूर्वी जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया स्पर्धा जिंकून बार्बाडोसमध्ये झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त केला होता आणि तेच घडलं. आता चाहत्यांना आशा आहे की, पुढील वर्षीही भारतीय संघ अशाच कामगिरीची पुनरावृत्ती करून चॅम्पियन्स ट्रॉफी आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा, या 15 खेळाडूंना मिळालं टीममध्ये स्थान
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा एकतर्फी पराभव! युवराज-भज्जी सारखे दिग्गज सपशेल अपयशी
हा पराभव टीम इंडिया कधीच विसरणार नाही, झिम्बाब्वेविरुद्ध भारतीय संघाच्या नावे अनेक लाजिरवाणे विक्रम