---Advertisement---

मोठी बातमी! जय शहा ACC अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत, डोक्यात आहे मोठा प्लॅन

Jay-Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या सचिवपदी जय शाह मागच्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत. तसेच मागच्या एका वर्षापासून त्यांनी आशियाई क्रिकेट काऊंसिलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. मंगळवारी (30 जानेवारी) इंडोनेशियाच्या बालीमध्ये एसीसीची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शाह काही मोठे निर्णय घेऊ शकतात.

माध्यमांतील वृत्तांनुसार आशियाई क्रिकेट काऊंसिलच्या (ACC) बैठकीत जय शाह (Jay Shah) मोठा निर्णय घेऊ शकतात. एसीसी अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. पण या निर्णयामागे देखील खास कारण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या निवडणुका यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहेत. अशात शाह आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. याविषयी शेवटचा निर्णय एसीसीच्या बैठकीतच घेतला जाईल. ही बैठक 2 दिवस (30-31 जानेवारी) चालणार आहे. यामध्ये आशिया खंडातील सर्व क्रिकेट बोर्डांचे सदस्य सामील असतील.

एसीसी अध्यक्ष जय शहा मागच्या काही वर्षांपासून बीसीसीआयच्या सचिव पदाची जबाबदारी देखील पार पाडत आहेत. एसीसी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहताना जय शहांना एका वर्षाहून अधिक काळ झाला आहे. एसीसीस अध्यक्षाचा कार्यकाळा दोन वर्षांचा होता. म्हणजे त्यांचा जवळपास एका वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. पण आयसीसी निवडणुकीला वेळ असतानाच ते एसीसीच्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकतात. असे असले तरी, बीसीसीआयच्या सचिवपदी ते कायम राहणार की ही जबाबदारी देखील सोडणार? याविषयी अद्याप स्पष्टता आली नाहीये. (Jay Shah is preparing to leave the post of ACC president and contest the election for the post of ICC president)

महत्वाच्या बातम्या – 
मोठी बातमी! विमान प्रवासादरम्यान दारू नेल्याने क्रिकेटपटू अडचणीत, क्रिकेट बोर्ड ऍक्शन मोडमध्ये
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा । स्पर्धेच्या अकराव्या दिवशी महाराष्ट्राला १ सुवर्ण आणि ३ रौप्य पदके

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---