भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षाला एक वेगळाच मान दिला जातो. आता लवकरच बीसीसीआयला नवे अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांच्या जागी सध्या बीसीसीआयचे सचिव असलेल्या जय शहा यांची वर्णी लागू शकते. अशा स्थितीत सौरव गांगुली हे आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात.
बुधवारी (14 सप्टेंबर) बीसीसीआयच्या घटनेतील बदलाबाबत सुमारे तीन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आलेल्या अपीलवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला त्यांच्या घटनेत सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. आता या बदलानंतर बोर्ड अधिकार्यांचा कार्यकाळ आणि कूलिंग ऑफ पीरियड यासंबंधीचे जुने नियम शिथिल केले जातील. त्यामुळे कोणताही पदाधिकारी बीसीसीआय किंवा राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये सलग सहा वर्षे पद भूषवू शकतो.
आता याचा फायदा जय शहा यांना होऊ शकतो. एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार,
‘सध्या 15 राज्य क्रिकेट संघटना वर्तमान सचिव जय शहा यांना बीसीसीआय अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा देण्याकरिता तयार आहेत. कोविड काळात आयपीएल यशस्वी करण्यात शहा यांचा मोठा वाटा असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे बीसीसीआय अध्यक्ष होण्याची ही त्यांची योग्य वेळ आहे.’
सध्या 33 वर्षाचे असलेले शहा 2019 मध्ये बीसीसीआयचे सचिव झाले होते. तेव्हापासून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी योगदान दिले आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सदस्य म्हणून ते बीसीसीआयमध्ये सामील झाले होते. त्यांचे पिता अमित शहा आहे सध्या भारताचे केंद्रीय गृहमंत्री आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…