भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा नुकताच संपला. भारतीय संघाला या दौऱ्यावर केवळ एक सामना जिंकण्यात यश आले. कसोटी मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर हे दोन सामने सलगरित्या गमावल्याने भारतीय संघ ती मालिका हरला. तर, केएल राहुलच्या नेतृत्वात वनडे मालिकेत भारताला यजमान संघाने व्हाईटवॉश दिला. मात्र, या दौऱ्यासाठी बऱ्याच काळानंतर संघात समाविष्ट केल्या गेलेल्या जयंत यादव (Jayant Yadav) याच्यावर पुन्हा एकदा अन्याय झाली चर्चा सुरू आहे.
काय घडले दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
जवळपास तीन वर्षानंतर अष्टपैलू जयंत यादव याला भारतीय संघात निवडण्यात आले होते. सुरुवातीला ही निवड केवळ कसोटी संघासाठी होती. मात्र, कसोटी मालिकेच्या तीनही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर, वनडे मालिकेसाठी निवड झालेला वॉशिंग्टन सुंदर हा दौऱ्यापूर्वी कोरोनाबाधित झाल्याने यादव याला वनडे संघात सामील करण्यात आले.
वनडे मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर केपटाऊन येथील मालिकेतील तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात यादव याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने सामन्यात केवळ २ धावा केल्या. तर, गोलंदाजीत त्याला ५३ धावा देत एकही बळी घेण्यात यश आले नाही.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत संधी नाही
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केवळ एक सामना खेळण्याची संधी मिळाल्यानंतर जयंत यादवला वेस्ट इंडीजविरूद्ध आगामी वनडे व टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे केवळ एका सामन्यातील कामगिरीच्या आधारे त्याला संघातून डच्चू देण्यात आल्याने चाहते नाराज आहेत.
अशी राहिली आहे कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये हरियाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जयंंतला आपल्या सहा वर्षाच्या कारकिर्दीत केवळ ५ कसोटी व दोन वनडे सामने खेळायला मिळाले आहेत. त्याने २०१६ मध्ये पहिला वनडे सामना खेळला होता. त्याच्या नावावर दोन सामन्यात एका बळीची नोंद आहे. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर, पाच सामन्यात १६ बळींसह २४६ धावांचे योगदानही त्याने दिल्याचे दिसून येते. त्यामुळे, अत्यंत कमी संधी मिळूनही त्याच्यावर अविश्वास दाखवला जाऊन त्याच्यावर अन्याय होत असल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या-
मेगा लिलावापूर्वी ‘थला’ चेन्नईत दाखल! १५ वर्षांत पहिल्यांदाच दिसणार ‘ते’ चित्र? (mahasports.in)