---Advertisement---

भारताच्या वनडे संघात दोन बदल, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सुंदरऐवजी ‘या’ खेळाडूची निवड

On: बुधवार, जानेवारी 12, 2022 4:54 PM
Bhuvneshwar Kumar, Washington Sundar Virat Kohli (Team India)
---Advertisement---

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून यानंतर १९ जानेवारीपासून उभय संघात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. त्यामुळे कसोटी संघाचा भाग नसलेले, पण वनडे मालिकेसाठी निवड झालेले भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेला बुधवारी पोहचले. त्यापूर्वी झालेल्या कोरोना चाचणीत अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने वनडे संघासाठी त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. तसेच आणखी एका खेळाडूचा संघात समावेश करण्यात आला आहे. 

अष्टपैलू जयंत यादव (Jayant Yadav) याला सुंदरऐवजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात (India ODI Team) संधी मिळाली आहे. यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवडण्यात आलेल्या कसोटी संघाचाही भाग असल्याने तो दक्षिण आफ्रिकेतच आहे. तसेच नवदीप सैनीला देखील भारतीय संघात सामील करण्यात आले आहे. सैनीला मोहम्मद सिराजसाठी पर्याय म्हणून संधी देण्यात आली आहे. सिराज सध्या दुखापतीतून सावरत आहे. 

सहा वर्षांनी यादवला वनडे पुनरागमनाची संधी
वॉशिंग्टन सुंदर बंगळूरूमधील शिबिरादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तो दक्षिण आफ्रिकेला जाणार नसल्याचे निश्चित झाले. त्यामुळे आता त्याच्याऐवजी भारताच्या वनडे संघात निवड झालेल्या जयंत यादवला तब्बल ६ वर्षांनी या क्रिकेट प्रकारात पुनरागमनाची संधी असणार आहे. त्याने आपला अखेरचा सामना एमएस धोनीच्या नेतृत्वात २०१६ मध्ये खेळला होता. त्यानंतर त्याला वनडे सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.

यादवने आत्तापर्यंत ५ कसोटी आणि १ वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व केले आहे. त्याने कसोटीत १६ विकेट्स घेतल्या असून १ शतक आणि १ अर्धशतकांसह २४६ धावा केल्या आहेत.

अधिक वाचा – केपटाऊनमध्ये विराटसेनेचा ‘भारतीय’ पाहुणचार, बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओ जिंकेल तुमचंही मन

सुंदरची अनुपस्थितीती भारताची चिंता वाढवणारी 
सध्या भारतीय संघाला चांगल्या अष्टपैलू खेळाडूची कमी जाणवत आहे. त्यातच रविंद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नाहीत. त्यातच वॉशिंग्टन सुंदरही या मालिकेतून बाहेर झाल्याने भारतीय संघाला अनुभवी अष्टपैलू खेळाडूची कमी अधिक जाणवू शकते.

तसेच मागील १० महिन्यांपासून दुखापतीमुळे भारतीय संघाच्या बाहेर असलेल्या सुंदरला या मालिकेतून पुनरागमनाची आस होती. मात्र, आता त्याचे पुनरागमन आणखी लांबणार असल्याचे निश्चित झाले आहे.

मोहम्मद सिराजही दुखापतग्रस्त 
मोहम्मद सिराज जोहान्सबर्ग येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी दरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो अद्याप या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे तो केपटाऊन कसोटीतूनही बाहेर पडला होता. त्यामुळे त्याच्या दुखापतीचा विचार करता बीसीसीआयने नवदीप सैनीला भारतीय संघात सामील करून घेतले आहे.

व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?

रोहितही मालिकेतून बाहेर
भारताच्या मर्यादीत षटकांचा नवनिर्वाचीत कर्णधार रोहित शर्मा देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकणार आहे. तोही सध्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार आहे, तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘खूप खराब खेळलो’, केपटाऊन कसोटीत भारताची फ्लॉप फलंदाजी पाहून प्रशिक्षकांनी दाखवली चूक

सिडनी कसोटीत दोन शतकांसह दणक्यात पुनरागमन करणाऱ्या ख्वाजासाठी वॉर्नर भावुक; म्हणाला, ‘स्वप्न अशीच…’

वन मॅन आर्मी! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाकी झुंज देणाऱ्या कोहलीचे होतंय भरभरून कौतुक, पाहा खास ट्वीट्स

द्रविडला 'जॅमी' टोपणनाव पडलं तरी कसं? | Story behind Rahul Dravid Nickname JAMMY

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---